Shiv Sena vs Rana: नवनीत राणांनी माघार घेताच.. शिवसेनेने हेरली संधी; गाठलं खिंडित!

मुंबई तक

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने आपलं आंदोलन मागे घेत असल्याचं काही वेळापूर्वीच जाहीर केलं होतं. मात्र, असं असलं तरीही जोवर राणा दाम्पत शिवसेनेची माफी मागत नाहीत तोवर शिवसैनिक त्यांच्या घराखालून हटणार नाहीत असं शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. ‘राणा दाम्पत्य शिवसेनेला सतत […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
Google CTA

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने आपलं आंदोलन मागे घेत असल्याचं काही वेळापूर्वीच जाहीर केलं होतं. मात्र, असं असलं तरीही जोवर राणा दाम्पत शिवसेनेची माफी मागत नाहीत तोवर शिवसैनिक त्यांच्या घराखालून हटणार नाहीत असं शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे.

‘राणा दाम्पत्य शिवसेनेला सतत डिवचत आहेत. चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. दोन गटांमध्ये दंगली उसळाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे शिवसेनेने आता त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.’ अशी माहिती देखील अनिल परब यांनी दिली आहे.

पाहा अनिल परब नेमकं काय म्हणाले:

‘हिंदूत्व यांच्याकडून आम्हाला शिकण्याची गरज नाही. 92-93 च्या दंगली मुंबईत झाल्या तेव्हा राणा दाम्पत्य कुठे होते? यांच्याकडून हिंदूत्व शिकण्याची वेळ शिवसेनेवर आलेली नाही. जो अतिरेकपणा त्यांनी गेले दोन दिवस केला मुंबईतील शिवसेनेला आव्हान दिलं. मातोश्री हे आमचं दैवत आहे. या दैवतावर जरी कोणी वाकडं नजर करुन बघत असेल तर शिवसैनिक कोणाचंही ऐकणार नाहीत.’