Sanjay Raut: खरी जनाब सेना कोण हे महाराष्ट्राला सांगणार.., राऊतांची भाजपवर तुफान टीका
मुंबई: ‘खरी जनाब सेना कोण हे शिवसेना महाराष्ट्रभरात जाऊन सांगणार आहे. एमआयएम आणि भाजप यांची हातमिळवणी आहे.’ असं वक्तव्य आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले: शिवसेना भवनात मुंबई, ठाण्यातील सगळे प्रमुख पदाधिकारी, खासदार आणि नेते बसलो विश्व संपर्क मोहीम 22 तारखेपासून सुरु होत आहे शिवसेनेकडून मराठवाडा आणि […]
ADVERTISEMENT
मुंबई: ‘खरी जनाब सेना कोण हे शिवसेना महाराष्ट्रभरात जाऊन सांगणार आहे. एमआयएम आणि भाजप यांची हातमिळवणी आहे.’ असं वक्तव्य आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
शिवसेना भवनात मुंबई, ठाण्यातील सगळे प्रमुख पदाधिकारी, खासदार आणि नेते बसलो विश्व संपर्क मोहीम 22 तारखेपासून सुरु होत आहे शिवसेनेकडून मराठवाडा आणि विदर्भात आमच्या नेत्यांचे दौरे होणार आहे. जे शिवसेनेविषयी गैरसमज परसवले जात आहेत भाजपकडून खास करुन त्यांचा जो उबग, विष, जळफळाट जो बाहेर पडतोय आमच्याविषयी त्याला उत्तर द्यायचंय. त्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं.
हे वाचलं का?
कसली जनाब सेना? शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वावादात कोणत्याही प्रकारची भेसळ न झाली ना आम्ही होऊ देणार. जे आम्हाला जनाब सेना म्हणतायेत त्यांनी त्यांचा इतिहास त्यांची कर्तबगारी तपासून पाहावी. काश्मीरच्या संदर्भात आज जे आम्हाला अक्कल शिकवतायेत ते काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी हातमिळवणी करुन सरकार स्थापन करणारा हाच भारतीय जनता पक्ष होता. मेहबुबा मुफ्ती सोबत कोणी सरकार स्थापन केलं. आम्ही तेव्हाही ओरडत होतो. की, हे पाकिस्तानवादी आहेत, फुटीतरतावादी आहेत. हे अतिरेक्यांशी, अफजल गुरुंशी हातमिळवणी करणारे आहेत.
यांच्यासोबत सरकार स्थापन करुन या देशातील हुत्मात्यांचा, काश्मिरी पंडितांच्या बलिदानाचा असा अपमान करु नका. हे सांगणारे आम्ही आहोत. तेव्हा त्यांनी मेहबुबा मुफ्तीशी क्रांतीकारक अशी युती करुन देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जनाब कोण हे आम्ही आता महाराष्ट्रात जाऊन सांगू.
ADVERTISEMENT
मोहन भागवतांच्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी एक उदाहण दिलं होतं. मोहन भागवत यांनी स्वत: सांगितलेलं की, या देशातून या देशात जे मुसलमानांच्या विरोधात भूमिका घेतील ते हिंदू नाहीत. त्यांना हिंदू म्हणता येणार नाही.
ADVERTISEMENT
आता जो काही प्रकार सुरु आहे एमआयएमचा शिवसेनेला किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा किंवा युतीची ऑफर. अरे तुमच्याकडे पाठिंबा मागितला कोणी. हे भाजपचे डावपेच आहेत. हे भाजपचं कारस्थान आहे. एमआयएम आणि भाजप यांची आतून हातमिळवणी आहे. त्यांना भाजपने आदेश दिला आहे की, शिवसेनेची बदनामी करा. शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करा. त्यानुसार MIM चे महाराष्ट्रातील नेते आहेत ते ऑफर करत आहेत. पण शिवसेना कधीही एमआयएमसोबत जाणर नाही.
जे औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन नतमस्तक होतात अशा कोणत्याही पक्षासोबत शिवसेनेचा कधीही संबंध नव्हता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT