IT Raid: अजून काय-काय आहे यशवंत जाधवांच्या ‘त्या’ डायरीत?
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगाव येथील घरावर 25 फेब्रुवारी 2022 रोजी आयकर विभागाने धाड टाकली होती. यावेळी आयकर विभागाने यशवंत जाधव घरातून काही महत्वाची कागदपत्रं, कॉम्प्युटर हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाइल, काही शासकीय कागदपत्रं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशांची आणि व्यवहारांची नोंद केलेली डायरी आयकर विभागाने […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगाव येथील घरावर 25 फेब्रुवारी 2022 रोजी आयकर विभागाने धाड टाकली होती. यावेळी आयकर विभागाने यशवंत जाधव घरातून काही महत्वाची कागदपत्रं, कॉम्प्युटर हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाइल, काही शासकीय कागदपत्रं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशांची आणि व्यवहारांची नोंद केलेली डायरी आयकर विभागाने जप्त केली होती. त्यावेळीच ‘या’ डायरीत नेमकं काय दडलंय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता याच डायरीमधील अत्यंत महत्त्वाची माहिती अशी समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
यशवंत जाधव यांच्याशी संबंधित एक दोन ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी आयकर विभागाने एकाच वेळी धाडी टाकल्या होत्या. ज्यामध्ये आयकर विभागाने बऱ्याच गोष्टी हस्तगत केल्या होत्या. ज्यामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशवंत जाधव यांची डायरी. याच डायरीमध्ये काही व्यवहार आणि पैशाच्या देवाणघेवाणीच्या नोंदी देखील असल्याचं समोर आलं आहे.
‘त्या’ डायरीमध्ये नेमकं काय?
यशवंत जाधव यांच्या डायरीमधील सगळ्यात महत्त्वाची नोंद आता समोर आली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये ‘मातोश्री’ला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे तर दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे.