मुंबईत घर परवडत नाही म्हणत शिवसेना आमदाराने केला म्हाडाकडे घरासाठी केला अर्ज
मुंबईत घर घेणं हे जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं. घरांच्या किंमती प्रचंड असल्याने सर्वसामान्य माणसांना घर खरेदी करणं कठीण असतं. त्यामुळेच म्हाडा आणि सिडकोने अल्प किंमतीत किंवा परवडणाऱ्या दरांमध्ये घरांची लॉटरी काढत असते. सामान्य माणसं या घरांसाठी अर्ज करत असतात. आता एका शिवसेना आमदाराने घरासाठी अर्ज केला आहे. मुंबईत घराची किंमत परवडत नसल्याने शिवसेना आमदाराने हा […]
ADVERTISEMENT

मुंबईत घर घेणं हे जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं. घरांच्या किंमती प्रचंड असल्याने सर्वसामान्य माणसांना घर खरेदी करणं कठीण असतं. त्यामुळेच म्हाडा आणि सिडकोने अल्प किंमतीत किंवा परवडणाऱ्या दरांमध्ये घरांची लॉटरी काढत असते. सामान्य माणसं या घरांसाठी अर्ज करत असतात. आता एका शिवसेना आमदाराने घरासाठी अर्ज केला आहे. मुंबईत घराची किंमत परवडत नसल्याने शिवसेना आमदाराने हा अर्ज केला आहे.
म्हाडाने आपल्या कोकण मंडळातून 8984 घरांची लॉटरी जाहीर केली. या लॉटरीत शिवसेनेच्या आमदाराने घरासाठी अर्ज केला आहे. पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी हा अर्ज केला आहे. दोन योजनांमध्ये श्रीनिवास वनगा यांनी अर्ज केला आहे. पहिला अर्ज ठाण्यातील घरांसाठी आहे तर दुसरा अर्ज मुंबईतील घरासाठी आहे.
श्रीनिवास वनगा यांचं म्हणणं काय?
‘मला जेव्हा जेव्हा मुंबईला यायचं असेल तेव्हा भाडे तत्त्वावर अपार्टमेंटमध्ये रहावं लागतं. मुंबईतील अपार्टमेंटचं भाडे हे एका एक लाख रूपयांपर्यंत गेलं आहे, ते परवडणारं नाही त्यामुळे मी मुंबईत घर शोधतो आहे. मी पालघर जिल्ह्यातील एका टोकाला म्हणजेच गुजरातच्या सीमेजवळ राहतो. ठाण्यात पोहचण्यासाठी मला तीन तास लागतात. त्यामुळे मी असं घर शोधतो आहे जे मंत्रालय-विधानसभा गाठण्यासाठी सोयीचं ठरेल.