‘…तेव्हापासून नितीन गडकरी अस्वस्थच आहेत’; ‘ईडी’चा उल्लेख करत शिवसेनेनं काय सांगितलं?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी रविवारी नागपुरात झालेल्या कार्यक्रमात राजकारणापासून दूर जाण्याबद्दल एक विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन शिवसेनेनं सद्यस्थितीवर भाष्य केलंय. ‘सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत. त्यांना जे चालले आहे ते असह्य होत आहे, पण करायचे काय?,’ असा प्रश्न शिवसेनेनं सामनातून उपस्थित केलाय. शिवसेनेनं सामना अग्रलेखात म्हटलंय की, “गडकरी यांचं नागपूरचं भाषण सगळ्यांनाच विचार […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी रविवारी नागपुरात झालेल्या कार्यक्रमात राजकारणापासून दूर जाण्याबद्दल एक विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन शिवसेनेनं सद्यस्थितीवर भाष्य केलंय. ‘सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत. त्यांना जे चालले आहे ते असह्य होत आहे, पण करायचे काय?,’ असा प्रश्न शिवसेनेनं सामनातून उपस्थित केलाय.
शिवसेनेनं सामना अग्रलेखात म्हटलंय की, “गडकरी यांचं नागपूरचं भाषण सगळ्यांनाच विचार करायला लावणारं आहे. सध्या राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आली आहे. महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे राजकारण कधी सोडतो असे वाटायला लागले आहे, अशी निरवानिरवीची भाषा गडकरी यांनी करावी हे वेदनादायी आहे.”
“सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत. त्यांना जे चालले आहे ते असह्य होत आहे, पण करायचे काय? या प्रश्नाने सतावले आहे. नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर गडकरी यांनी नेमके बोट ठेवले आहे.”
राजकारण कधी सोडू अन् कधी नये असं झालंय; नितीन गडकरी यांचं मोठं विधान