शिवसेना : “शिवलिंगाचा सर्वत्र शोध घेणारे सरसंघचालकांचे मत मान्य करतील का?”
ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा सध्या प्रचंड गाजतोय. याच प्रकरणावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. त्याचाच धागा पकडत शिवसेनेनं (Shiv sena) आता भाजपला (Bjp) सुनावलं आहे. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) सरसंघचालक भागवत यांचा हवाला देत निशाणा साधला आहे. सरसंघचालकांच्या भूमिकेवर शिवसेना काय म्हणाली? शिवसेनेनं सरसंघचालकांच्या भाषणांचा उल्लेख करत […]
ADVERTISEMENT

ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा सध्या प्रचंड गाजतोय. याच प्रकरणावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. त्याचाच धागा पकडत शिवसेनेनं (Shiv sena) आता भाजपला (Bjp) सुनावलं आहे. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) सरसंघचालक भागवत यांचा हवाला देत निशाणा साधला आहे.
सरसंघचालकांच्या भूमिकेवर शिवसेना काय म्हणाली?
शिवसेनेनं सरसंघचालकांच्या भाषणांचा उल्लेख करत ज्ञानव्यापी मशीद प्रकरणावर भाष्य केलं आहे.
“सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका व्यक्त केली आहे, ‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका, ‘आमचेच खरे’ असा कट्टरवाद नको.’ भागवत यांची भूमिका हिंदुत्ववादी असली तरी संयमाची आहे. भागवत म्हणतात, ज्ञानवापीशी हिंदूंच्या भावना जुळलेल्या आहेत. त्यावर न्यायपालिका देईल तो निर्णय प्रत्येकाने मान्य करायला हवा. एकापरीने सरसंघचालकांनी देशातील सध्याच्या वातावरणावर परखड मत व्यक्त केले आहे, पण शिवलिंगाचा सर्वत्र शोध घेणारे सरसंघचालकांचे मत मान्य करतील काय?”