लखीमपूरमधील केंद्रीय मंत्रीपुत्राचे प्रताप अन् कोकणातील हल्ला सारखाच; नितेश राणेंवरून सेनेचा फडणवीसांवर निशाणा
हिवाळी अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले. या अधिवेशनातही विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधिमंडळाच्या पायऱ्यावर नितेश राणेंनी काढलेल्या मांजरीच्या आवाजाचा मुद्दाही सभागृहात गाजला. तर संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सभागृहाबाहेर पडसाद उमटले. या सर्वच मुद्द्यांवरून शिवसेनेनं आता भाजपवर टीकेचे बाण डागले […]
ADVERTISEMENT

हिवाळी अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले. या अधिवेशनातही विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधिमंडळाच्या पायऱ्यावर नितेश राणेंनी काढलेल्या मांजरीच्या आवाजाचा मुद्दाही सभागृहात गाजला. तर संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सभागृहाबाहेर पडसाद उमटले. या सर्वच मुद्द्यांवरून शिवसेनेनं आता भाजपवर टीकेचे बाण डागले आहेत.
शिवसेनेचे विरोधकांना अग्रलेखातून फटकारे
“महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. पण ते राज्यघटनेनुसार चालू दिले जात आहे काय? घटनेनुसार ज्यांनी राज्य चालवायचे ते आपले सन्माननीय राज्यपालच राज्यात घटनात्मक कोंडी करताना दिसत आहेत. ही कोंडी भारतीय जनता पक्षाच्या सोयीसाठी केली जात असेल तर तो सरळ सरळ राजकीय हस्तक्षेप आहे. महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून जे रामायण, महाभारत घडवले गेले व त्याद्वारे शेवटपर्यंत विधानसभेला अध्यक्षच लाभू दिला गेला नाही, याची जबाबदारी शेवटी कोण घेणार?”
“राज्यपाल घटनाबाह्य पद्धतीने वर्तन करतात व त्यांच्याशी संघर्ष केला की भाजपचे पुढारी राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची भाषा करणार, याला आता जनता विटली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली असून राजभवनात बसून आपणच राजशकट हाकत असल्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख मंडळींना पडले आहे. दोन वर्षांपासून या मंडळींची झोप उडाली असताना जागेपणी त्यांना स्वप्ने पडतात. याचाच अर्थ त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.”