Nagpur MLC Election 2023 : निष्ठावंत नेत्यानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ

मुंबई तक

Maharashtra MLC Election 2023 Update : नागपूर : जिल्ह्यात शिवसेना (UBT) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (UBT) नागपूर ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. गंगाधर नाकडे यांची उमेदवारी डावलल्याने नाराज होऊन माथनकर यांनी शिवसेना (UBT) पक्षाचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. दिलीप माथनकर हे शिवसेना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra MLC Election 2023 Update :

नागपूर : जिल्ह्यात शिवसेना (UBT) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (UBT) नागपूर ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. गंगाधर नाकडे यांची उमेदवारी डावलल्याने नाराज होऊन माथनकर यांनी शिवसेना (UBT) पक्षाचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे.

दिलीप माथनकर हे शिवसेना (UBT उद्धव ठाकरे यांच्या जवळचे शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. पण गंगाधर नाकडे यांची उमेदवारी डावलल्याने शिवसैनिक दुखावले आहेत. पक्षाला आपला उमेदवार कायम राखता आला नाही. गेले अनेक महिने आम्ही परिश्रम केले परंतु नेतृत्वाने जागा सोडायला लावल्याने नाराज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेल्यानंतरही दिलीप माथनकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नव्हती. परंतु नागपूर विभाग शिक्षक विधान परिषद निवडणुकीमध्ये पक्षाचा एबी फॉर्म मिळून सुद्धा पक्षाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांना माघार घ्यावी लागली. अखेर त्यांनी जिल्हाप्रमुखांकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे.

अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर शिक्षक मतदारसंघातून पाच उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. यात नीलकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके, गंगाधर नाकाडे आणि मृत्युंजय सिंग यांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. तर शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि सतीश इटकेलवार यांनी त्यांचे अर्ज कायम ठेवले.

सतीश इटकेलवर यांचं निलंबन :

दुसऱ्या बाजूला नागपूर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सतीश इटकेलवार यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आदेश देऊनही अर्ज कायम ठेवल्याने त्यांच्यावर पक्षाकडून त्यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनाचा राष्ट्रवादीचाही पाठिंबा राहिलं असं जाहीर करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp