‘शिवसेना आता संपण्याच्या वाटेवरच’;भाजपाध्यक्ष जेपी नड्डा कार्यकर्त्यांसमोर काय बोलले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटातील नेत्यांकडून होत असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठं विधान केलं आहे. जम्मू कश्मीर ते केरळातील प्रादेशिक पक्षांची नावं घेत नड्डा यांनी कार्यकर्त्यांसमोर भाजपचे इरादे स्पष्ट केले.

बिहारमध्ये जिल्हा पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात जेपी नड्डा बोलत होते. यावेळी त्यांनी राजकारणातील घराणेशाहीवर हल्ला चढवला. “पक्ष कार्यालयाचा वापर रणनीती ठरवण्यासाठी केला पाहिजे. नियोजन करण्यासाठी केला पाहिजे. भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जो विचारधारेवर चालतोय. वैचारिक पायावर आपण उभे आहोत. मी हे वारंवार सांगतो की, जर हा विचार नसता तर आपण इतकी मोठी लढाई लढू शकलो नसतो”,असं जेपी नड्डा म्हणाले.

“सगळे लोक संपले आहेत. मिटले आहेत. जे नाही संपले, ते संपून जातील. फक्त भाजप राहिल. एका विचारामुळे आपण लढत आहोत. विचारांमुळे जोडले गेलेलो आहोत. कार्यकर्त्यांचा बेस बनतो तो पक्ष कार्यालयात.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“मला अनेकजण सांगतात काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी. मी म्हणालो प्रयत्न करून बघा. दोन दिवसांत कार्यकर्ता तयार होत नाही. आमच्याप्रमाणे ४० वर्ष तपश्चर्या करावी लागेल, तेव्हा उभे राहतील. संस्कारातून हे आलेलं आहे”, असं नड्डांनी सांगितलं.

संजय राऊत यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “हे सगळं तर…”

ADVERTISEMENT

“आज २०-३० वर्षे काम केल्यानंतर दुसऱ्या पक्षातून लोक भाजपत येत आहेत. का येत आहेत? कारण त्यांना कळलंय की देशात परिवर्तन घडवून आणण्याचं कुठलं माध्यम आहे, तर ते आहे भारतीय जनता पक्ष. २० ते ३० वर्ष एखाद्या पक्षात काम केल्यानंतर दुसऱ्या पक्षात जाणं ही छोटी घटना नाहीये”, असं म्हणत दुसऱ्या पक्षातून भाजप येणाऱ्या नेत्यांबद्दल नड्डा यांनी भूमिका मांडली.

ADVERTISEMENT

“आज भाजपच्या विरोधात लढू शकेल, असा कोणताच विरोधी पक्ष नाहीये. एकही राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही. कोणतीही विचाराधारा राहिलेली नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींनी सांगितलं होतं की, एक देश, एक निशाण, एक प्रधान. तेव्हापासून सुरू झालेला लढा संपला. ३७० कलम हटवलं गेलं.”

“अमित शाहाला तुम्ही तुरुंगात पाठवलं होतं”; रावसाहेब दानवेंनी संजय राऊतांना दिला सल्ला

“राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही असं म्हणतो कारण काँग्रेसने कधीच प्रादेशिक इच्छा आकांक्षांना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे दक्षिण भारतातून संपली आहे. केरळातही संपत चालली आहे. कर्नाटकात कुमकुवत झाली आहे. तामिळनाडूतून आधीच संपले. इथे सगळीकडे पूर्वी काँग्रेस होती”, असं जेपी नड्डा म्हणाले.

जेपी नड्डा यांची राजकारणातील घराणेशाही टीका

“विचारांच्या बळावर आज नाही, तर उद्या आपण या राज्यांमध्येही कमळ फुलवू. आपला लढा कुणाशी आहे. घराणेशाहीशी. कश्मिरात आपला लढा कुणाशी आहे, तर पीडीपीसोबत. मेहबुबांची पार्टी आहे. कुटुंबांची पार्टी आहे. नॅशनल कॉन्फरन्स, ओमर अब्दुल्ला-फारुक अब्दुल्लांची पार्टी आहे. कुटुंबाची पार्टी आहे.”

“हरयाणा, पंजाबात बघा शिरोमणी अकाली दल. एका कुटुंबाची पार्टी आहे. आता दुसरा पक्ष बनलाय, तोही कुटुंबाचाच पक्ष बनला आहे. २४ कोटी लोकसंख्या असलेला उत्तर प्रदेश आहे. काँग्रेसने २८७ जागांवर निवडणूक लढवली आणि सर्व जागांवर डिपॉझिट जप्त झालं. आता आमच्याशी कोण लढतोय, समाजवादी पार्टी. एका कुटुंबाची पार्टी. बिहारमध्ये भाजप कुणाशी लढतोय, तर राजदसोबत. तीही कुटुंबाची पार्टी”, असं नड्डा कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे -संजय राऊत

पश्चिम बंगालमध्ये कुणाशी लढतोय, तीही एका कुटुंबाची पार्टी आहे. ओडिशामध्ये बीजेडी हा एका व्यक्तीचा पक्ष आहे. तेलंगणामध्ये बघा, केसी राव यांचा तेलंगणा राष्ट्र समिती एका कुटुंबाचा पक्ष. तामिळनाडूत घराणेशाही असलेला पक्ष आहे.”

शिवसेना एका कुटुंबाची पार्टी; जेपी नड्डा काय म्हणाले?

“शिवसेना! जी आता संपण्याच्या वाटेवरच आहे, तीही कुटुंबाची पार्टी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एका कुटुंबाचा पक्ष आहे. आणि मी खूप वेळा सांगत असतो की, काँग्रेसही आता फक्त भावा-बहिणीचा पक्ष राहिलेला आहे. बाकी काही नाही. त्यामुळे भाजपचा लढा हा घराणेशाही पक्षांविरोधात आहे. ही गोष्ट मी बिहारमध्ये बोलतोय कारण बिहार भारतीय लोकशाहीची जननी आहे”, असं जेपी नड्डा म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT