बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी CM शिंदेंचं वंदन; शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून केलं शुद्धीकरण
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या (गुरुवारी) दहावा स्मृती दिन आहे. या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार, पदाधिकाऱ्यांसह शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. मात्र शिंदे येऊन गेल्याच्या अवघ्या काही वेळातच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी तिथं गोमूत्र शिंपडलं. खासदार अरविंद सावंत […]
ADVERTISEMENT
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या (गुरुवारी) दहावा स्मृती दिन आहे. या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार, पदाधिकाऱ्यांसह शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. मात्र शिंदे येऊन गेल्याच्या अवघ्या काही वेळातच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी तिथं गोमूत्र शिंपडलं.
ADVERTISEMENT
खासदार अरविंद सावंत काय म्हणाले?
यावेळी खासदार अरविंद सावंत म्हणाले, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दैवताने निष्ठा आणि एकजूट यांचा संस्कार आमच्यावर केला. गद्दारांबद्दल तर त्यांची प्रचंड चिड होती. याच शीवतीर्थावरुन त्यांनी सांगितलं होतं की, आता जर कोणी शिवसेना सोडून गेलं तर त्या आमदारांना रस्त्यात तुडवा.
त्या शिवसेना प्रमुखांच्या पवित्र स्मृतीस्थळी अमंगल आणि अपवित्र माणसं येणं आणि त्यांनी पूजन करणं, हे म्हणजे आमच्या मनात जे शिवसेनाप्रमुखांच स्थान आहे त्याला चऱ्हे ओढण्यासारखं आहे. म्हणून शिवसैनिक चिडला आणि त्याने हे स्थान आपल्या संस्कृतीप्रमाणे गोमूत्र शिंपडून पवित्र केलं, असंही खासदार सावंत म्हणाले.
हे वाचलं का?
एकनाथ शिंदे स्मृतीस्थळावर :
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील होते. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. मात्र शिंदे येऊन गेल्याच्या अवघ्या काही वेळातच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी तिथं गोमूत्र शिंपडलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT