नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंना ‘म्याव म्याव’ चिडवणं भोवणार?
राज्य सरकारचं अधिवेशन आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. आज पुन्हा एकदा अधिवेशनात वादाचा अंक पाहण्यास मिळाला. याचं कारण होतं भाजप आमदार नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी. दोन दिवसांपूर्वी नितेश राणे आणि भाजपचे आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना आदित्य ठाकरे सभागृहात आले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढत आदित्य ठाकरेंना […]
ADVERTISEMENT

राज्य सरकारचं अधिवेशन आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. आज पुन्हा एकदा अधिवेशनात वादाचा अंक पाहण्यास मिळाला. याचं कारण होतं भाजप आमदार नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी. दोन दिवसांपूर्वी नितेश राणे आणि भाजपचे आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना आदित्य ठाकरे सभागृहात आले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढत आदित्य ठाकरेंना चिडवलं. मात्र आदित्य ठाकरे त्यावर दुर्लक्ष करून निघून गेले. मात्र हाच मुद्दा आज सभागृहात गाजतो आहे.
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी केली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत त्यांना निलंबित करावं असं म्हटलं आहे. सभागृहाची प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठीचा विषय आता पुन्हा एकदा आज सभागृहात याच निमित्ताने चर्चेला आला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी अंगविक्षेप करून मोदींची नक्कल केल्याप्रकरणी मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला लावली होती. मी माफीही मागितली. आता नितेश राणे यांनी केलेलं वर्तन हे सभागृहाची परंपरा राखणारं आहे का? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.
‘बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, नाहीतर…’ भास्कर जाधव यांची भाजपवर घणाघाती टीका
12 आमदारांच्या निलंबनांतर नितेश राणेंनी माझ्याबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नेत्यांचा वारंवार अपमान होत आहे असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला. “चंद्रकांत पाटलांची घोषणा होती आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. तुम्ही त्यांना घडवले की तुम्हाला त्यांनी घडवले हे सांगण्याची गरज आहे. त्याचवेळी त्यांनी थांबवायला पाहिजे होते. त्यांनी थांबवले नाही म्हणून काळ सोकावला आहे. अशा सदस्याला कायमस्वरुपी निलंबित करा अशी माझी मागणी आहे,” असे भास्कर जाधव म्हणाले.