प्रताप सरनाईक-एकनाथ शिंदे यांच्यात मतदारसंघांच्या मुद्द्यावरून वाद, खरं काय?

मुंबई तक

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याच्या वृत्ताचे स्वतः प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी खंडन केले. सरनाईक यांनी ते निवडून येत असलेला ओवळा-माजीवाडा मतदारसंघ भाजपच्या एका माजी आमदाराकरिता सोडावा, यासाठी शिंदे यांनी दबाव टाकायला सुरुवात केल्याने दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर सरनाईक पिता-पुत्रांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याच्या वृत्ताचे स्वतः प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी खंडन केले. सरनाईक यांनी ते निवडून येत असलेला ओवळा-माजीवाडा मतदारसंघ भाजपच्या एका माजी आमदाराकरिता सोडावा, यासाठी शिंदे यांनी दबाव टाकायला सुरुवात केल्याने दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर सरनाईक पिता-पुत्रांनी या बातम्यांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे – सरनाईक वादाच्या चर्चा :

मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार सरनाईक यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून ताणले आहेत. तसेच दोघांमध्ये दोन-तीनदा खडाजंगीही झाली. याचे कारण म्हणजे सरनाईक निवडून येत असलेला ओवळा माजीवाडा हा मतदारसंघ भाजपच्या एका माजी आमदाराला द्यावा यासाठी शिंदे आग्रही आहेत.

त्यासाठी शिंदेंच्या निकटवर्तीयांकडून सरनाईक यांच्या निकटवर्तीयांना फोडण्यासाठी विविध आमिषे दाखवली जात आहेत. सरनाईकांना ही गोष्ट कळताच त्यांनी थेट शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांना जाब विचारला. दोघांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक देखील उडाली, अशा प्रकारच्या चर्चा होत्या.

दरम्यान, या सर्व चर्चांचे प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांनी खंडन केले आहे. ‘मुंबई तक’शी बोलताना सरनाईक म्हणाले, या सर्व चर्चा आणि बातम्या तथ्यहीन आहेत. कुठलीही शहानिशा न करता अशा बातम्या दिल्या जातात. थोड्याच वेळात मी आणि मुख्यमंत्री एकाच कार्यक्रमात आहोत. तर पूर्वेश सरनाईक यांनी एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचा एक फोटो ट्विट करुन त्याला दो दिल और एक जान है हम असे कॅप्शन दिले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp