उत्पल पर्रिकरांची बंडखोरी, सामना मधून शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र; काँग्रेसलाही टोमणे
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर याला पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आलं आहे. पक्षाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध दंड थोपटून उत्पल पर्रिकरांनी आपण अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचं सांगितलं. एकीकडे भाजपचं केंद्रीय नेतृत्व अजुनही उत्पल यांची समजतून काढण्याच्या प्रयत्नात असताना शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. उत्पल पर्रिकरांचे कर्तृत्व […]
ADVERTISEMENT
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर याला पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आलं आहे. पक्षाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध दंड थोपटून उत्पल पर्रिकरांनी आपण अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचं सांगितलं. एकीकडे भाजपचं केंद्रीय नेतृत्व अजुनही उत्पल यांची समजतून काढण्याच्या प्रयत्नात असताना शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
ADVERTISEMENT
उत्पल पर्रिकरांचे कर्तृत्व काय आणि घराणेशाहीच्या निकषावर भाजपमध्ये उमेदवारी मिळत नाही असं प्रवचन सध्या झोडलं जात आहे, हा खरंतर खोटारडेपणाचा कळस असल्याचं शिवसेनेने आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे. खुद्द पणजीत ज्या बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यांच्या पत्नीला ताळगाव मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. विश्वजीत राणेंना वाळपई तर त्यांच्या पत्नी दिव्या यांना पर्ये मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. इथे भाजपच्या धुरिणींना घराणेशाहीचा प्रश्न पडला नाही का असा सवाल आजच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
माझ्या भवितव्याची चिंता करु नका, मनात भाजप कायम – उत्पल पर्रिकरांनी इतर पक्षांच्या ऑफर धुडकावल्या
हे वाचलं का?
उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यांच्या सुनेला भाजपने उमेदवारी दिली, ही घराणेशाही नाही काय? दुसऱ्या पक्षातील घराणेशाहीला वाजत गाजत पालखीत बसवायचं आणि मनोहर पर्रिकरांच्या पुत्राच्या बाबतीत कर्तबगारी आणि घराणेशाहीची मोजपट्टी लावायची हा विनोद आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे.
Goa Assembly Election: उत्पल मनोहर पर्रिकरांनी फडकवला भाजपविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष लढणार
ADVERTISEMENT
याच अग्रलेखात शिवसेनेने काँग्रेसलाही टोमणे लगावले आहेत. “गोव्याच्या राजकारणाचा सध्या खेळखंडोबा झाला आहे. तिकडच्या जनतेलाच तो रोखाला लागणार आहे. काँग्रेसने शहाणपणा दाखवला असता तर गोव्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसारखा प्रयोग राबवता आला असता व तो यशस्वीही झाला असता. परंतू काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला आहे की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले आहे.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT