संजय राऊत दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेणार
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सिंघू बॉर्डरवर पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच २६ जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचाराच्या घटनाही घडल्या ज्यानंतर काही शेतकरी संघटनांनी या आंदोलनातून माघार घेतली. अद्यापही या आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला यश आलेलं नाही. अशातच शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आज सिंघू बॉर्डरवरील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट […]
ADVERTISEMENT
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सिंघू बॉर्डरवर पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच २६ जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचाराच्या घटनाही घडल्या ज्यानंतर काही शेतकरी संघटनांनी या आंदोलनातून माघार घेतली. अद्यापही या आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला यश आलेलं नाही. अशातच शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आज सिंघू बॉर्डरवरील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.
ADVERTISEMENT
राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या भेटीची माहिती दिली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संकटकाळात नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सुचनेवरुन मी आज सिंघू बॉर्डरवरील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेणार आहे
गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आतापर्यंत अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या. मात्र यात अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाहीये.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT