क्रिस रॉक प्रकरणावरून धडा घ्या! अतिरेक कराल तर कानशिलात बसणारच, शिवसेनेचा भाजपला इशारा
ऑस्कर पुरस्कार सोहळा चर्चेत राहिला तो क्रिस रॉकला अभिनेता विल स्मिथने जी कानशिलात लगावली त्यामुळे. क्रिस रॉक शो होस्ट करत होता. त्याचवेळी विल स्मिथच्या पत्नीची त्याने खिल्ली उडवली. जी सहन न झाल्याने विल स्मिथ जागेवरून उठला क्रिस रॉकच्या समोर जाऊन त्याला जोरदार कानशिलात लगावली. या घटनेची जगभरात चर्चा झाली. आता याच प्रकरणावरून शिवसेनेने भाजपलाही इशारा […]
ADVERTISEMENT

ऑस्कर पुरस्कार सोहळा चर्चेत राहिला तो क्रिस रॉकला अभिनेता विल स्मिथने जी कानशिलात लगावली त्यामुळे. क्रिस रॉक शो होस्ट करत होता. त्याचवेळी विल स्मिथच्या पत्नीची त्याने खिल्ली उडवली. जी सहन न झाल्याने विल स्मिथ जागेवरून उठला क्रिस रॉकच्या समोर जाऊन त्याला जोरदार कानशिलात लगावली. या घटनेची जगभरात चर्चा झाली. आता याच प्रकरणावरून शिवसेनेने भाजपलाही इशारा दिला आहे. क्रिस रॉक प्रकरणावरून धडा घ्या अन्यथा कानशिलात बसणारच असं शिवसेनेने भाजपला सामनाच्या अग्रलेखातून सुनावलं आहे.
काय म्हटलं आहे अग्रलेखात?
ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथने होस्ट क्रिस रॉकच्या जी जोरदार कानशिलात लगावली त्याची जगभरात चर्चा झाली. या घटनेच्या दोन दिवस आधी पाटण्यात एका माथेफिरू तरूणाने नितीशकुमार यांच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. हा काही अतिरेकी हल्ला किंवा दहशतवादी हल्ला नव्हता. शरद पवारांपासून अनेक नेत्यांच्या बाबतीत असे प्रसंग ओढावले आहे. पंडित नेहरूंनाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणीच्या निर्वासितांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
ऑस्करच्या मंचावर जो प्रकार घडला त्याचं एका ओळीत वर्णन करता येईल ते म्हणजे क्रिस रॉकने ताळतंत्र सोडलं त्यामुळे विल स्मिथचा संमय सुटला. क्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीची जी मस्करी केली त्यामुळे विल स्मिथ चिडला आणि त्याने उठून रॉकच्या कानशिलात लगावली. एखाद्या विद्रोही शिवसैनिका प्रमाणे विल स्मिथने क्रिस रॉकवर हल्ला केला. क्रिस रॉक प्रकरणाचा धडा हा आहे की अतिरेक कराल तर कोणत्याही मंचावर तुमच्या कानशिलात बसू शकते. आता क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्याबद्दल महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी एखादे निषेधाचे पत्रवगैरे काढून त्याला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे का हे बघावं लागेल.