“Narayan Rane यांचं मंत्रिपद जाणार” : बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
Narayan rane ministry : कणकणवली : येत्या दोन महिन्यात नारायण राणे (Narayan Rane) यांचं केंद्रीय मंत्रिपद जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट कुडाळ मालवणचे शिवसेना (UBT) गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केला. ते म्हणाले, आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंचं राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार आहे. भाजपला (BJP) आता राणेंची राजकीयदृष्टया गरज नाही. त्यामुळे राणेंना […]
ADVERTISEMENT
Narayan rane ministry :
ADVERTISEMENT
कणकणवली : येत्या दोन महिन्यात नारायण राणे (Narayan Rane) यांचं केंद्रीय मंत्रिपद जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट कुडाळ मालवणचे शिवसेना (UBT) गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केला. ते म्हणाले, आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंचं राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार आहे. भाजपला (BJP) आता राणेंची राजकीयदृष्टया गरज नाही. त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार, असे भाकीत त्यांनी वर्तविले. ते कणकवलीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Shivsena ubt leader vaibhav naik statement on Narayan rane ministry)
तळकोकणात राणे विरुद्ध नाईक यांच्यातील वादाचा इतिहास जुना आहे. राणे आणि नाईक कुटुंबीयांकडून एकमेकांवर कायमचं टीका केली जात असते, वाभाडे काढले जात असतात. त्यामुळे कोकणातील राजकारण सतत तापलेलं असतं. अशात आता नाईक यांनी नारायण राणेंच्या भेट मंत्रिपदावरच भाष्य केलं आहे. त्यांचं मंत्रिपद दोन महिन्यात जाणार असल्याचं नाईक यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
यावेळी नाईक यांनी राणे कुटुंबियांवर ईडीच्या चौकशीवरुनही टीका केली. ते म्हणाले. नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसचं पुढे काय झालं? वडिलांनी नेमका कोणता समजोता केला ? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा, असा टोलाही नाईक यांनी राणेंना लगावला.
भाजप-राष्ट्रवादी एकत्र : सुषमा अंधारेंचं एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना चॅलेंज
ADVERTISEMENT
संजय राऊतांचंही भाकीत :
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत यांनीही नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा केला होता. नारायण राणे हे केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग खात्याचे मंत्री आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं मंत्रिपद जाणार आहे. कारण शिंदे गटाच्या लोकांना मंत्रिमंडळात घ्यायचं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.
ADVERTISEMENT
sheetal Mhatre : व्हिडीओ व्हायरल, मध्यरात्री रंगलं नाट्य; शीतल म्हात्रे संतापल्या
मोदींनीही दिला होता इशारा?
याशिवाय थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राणेंना इशारा दिला असल्याचा गौप्यस्फोट रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी केला होता. नारायण राणेंकडे असलेल्या पीएने या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडे घातले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी राणेंना समज दिली होती. “त्या पीएला आधी हाकला, अन्यथा तुमचं मंत्रीपद काढून घेऊ” असा इशारा दिल्याचं राऊत यांनी सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT