शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरेंचा दौरा, अंबादास दानवेही नाशिक दौऱ्यावर
उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरे यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची दुःखं जाणून घ्यायचं ठरवलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबादचा दौरा केला. आता आज आदित्य ठाकरे नाशिक दौरा करत आहेत. त्यांच्यासोबत अंबादास दानवेही आहेत. आज दुपारी १२ वाजता आदित्य ठाकरे नाशिकच्या सिन्नर तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. त्यानंतर वडगाव आळेफाटा या ठिकाणी जातील. […]
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरे यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची दुःखं जाणून घ्यायचं ठरवलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबादचा दौरा केला. आता आज आदित्य ठाकरे नाशिक दौरा करत आहेत. त्यांच्यासोबत अंबादास दानवेही आहेत.
आज दुपारी १२ वाजता आदित्य ठाकरे नाशिकच्या सिन्नर तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. त्यानंतर वडगाव आळेफाटा या ठिकाणी जातील. तरस शिरूर वाघाळे या पुणे जिल्ह्यातल्या गावांनाही ते भेट देणार आहेत.
नाशिक दौऱ्यावर जाण्याआधी काय म्हणाले आदित्य ठाकरे?
राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. आज आम्ही शेतकऱ्यांना धीर द्यायला जात आहोत. सरकार किती घटनाबाह्य असलं तरीही सरकारी यंत्रणेकडून मदत ही लगेच झाली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारं आमचं सरकार होतं. आता विरोधी पक्षात असलो तरी आमची जबाबदारी म्हणून आम्ही जात आहोत.”
शेतकऱ्यांसोबत उभं राहणं गरजेचं आहे
पुढे बोलताना ते म्हणाले की, “शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर उभे राहणार आहोत. शेतकऱ्यांसोबत उभं राहणं हे गरजेचे आहे. दहीहंडी असो वा शिधा वाटपाबाबत घोषणा आणि तारखा फक्त पाहायला मिळतात. कृषीमंत्री आणि इतर मंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाऊन भेट देणे गरजेचे आहे. राजकारण दूर ठेवा आणि मदत करा असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.