ज्या शाळेत शिकली तिथल्याच मुलांना केलं ठार, कोण होती हल्लेखोर ट्रान्सजेंडर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shooting at the school where she studied Who is 28-year-old transgender audrey hale who shocked America
Shooting at the school where she studied Who is 28-year-old transgender audrey hale who shocked America
social share
google news

नॅशविले (अमेरिका) : अमेरिकेतील (America) नॅशविलेमधील एका खासगी शाळा सोमवारी बंदुकीच्या गोळ्यांनी हादरून गेली. हा हल्ला याच शाळेची माजी विद्यार्थिनी ऑड्रे हाले (वय 28 वर्ष) हिने केला. ती एक ट्रान्सजेंडर आहे. ऑड्रेकडे दोन असॉल्ट रायफल आणि एक हँडगन होती, ज्याने तिने सहा जणांना ठार केले. यामध्ये तीन मुलांचाही समावेश आहे. (Shooting at the school where she studied Who is 28-year-old transgender audrey hale who shocked America)

ADVERTISEMENT

प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ऑड्रेला ही जागीच ठार झाली. ऑड्रेने पूर्ण नियोजन करून हा हल्ला केला होता. कारण तिच्याकडून शाळेचे नकाशेही हस्तगत झाले आहेत. 2023 मधील सामूहिक गोळीबाराची ही 129 वी घटना आहे.

हल्ला कसा केला?

पोलिसांचे म्हणणे आहे की, ऑड्रेने नॅशव्हिलेमधील ख्रिश्चन कॉव्हेंट स्कूलमध्ये बाजूच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला. गोळीबार करताना ती पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर पोहोचली. यावेळी शाळेच्या सर्व दरवाजे बंद होते. मात्र, तिने गोळ्या झाडून हे दरवाजे तोडले आणि पुढे जात होती. त्यावेळी शाळेतील तीन मुलं आणि शाळेतील तीन कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जणांची तिने हत्या केली.

हे वाचलं का?

नॅशव्हिलेचे पोलीस प्रमुख जॉन ड्रेक यांनी सांगितले की, ‘सोमवारी सकाळी 10.13 वाजता हा हल्ला झाला तर पोलिसांनी 10.27 मिनिटांनी हल्लेखोराला ठार केले. शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील लॉबी परिसरात पोलिसांनी ऑड्रेला गोळ्या घातल्या. 28 वर्षीय ऑड्रे असे हल्लेखोराचे नाव असून ती ट्रान्सजेंडर होती. ती या शाळेची विद्यार्थिनी होती. तिने केलेल्या हल्ल्यामागचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, हल्ल्यानंतर घाबरलेली मुले शाळेतून बाहेर पडताना पाहून आम्ही भावूक झालो.’

ADVERTISEMENT

अधिक वाचा- गे डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेट; समलैंगिक संबंध ते निर्घृण खुनाची खळबळजनक घटना

हल्ल्यातील मृतांची नावं

एव्हलिन डिकहॉस, हेली स्क्रग्स आणि विल्यम कीन हे तीन मृत पावलेले विद्यार्थी साधारण 9 वयोगटातील होते. तर सिंथिया पीक (वय 61 वर्ष), माइक हिल (वय 61 वर्ष) आणि कॅथरीन कून्स (वय 60 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

ADVERTISEMENT

टेलिव्हिजन फुटेजमध्ये शाळकरी मुलांना हाताला धरून शाळेबाहेर काढलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. एका फोटोमध्ये एक मुलगी शाळेच्या खिडकीतून रडताना दिसत आहे. दरम्यान, या भयंकर हल्ल्याने संपूर्ण अमेरिका हादरून गेली आहे.

या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ही घटना हृदयद्रावक असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘पुरे झाले.. आता अशा घटना यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत. संसदेत शस्त्रास्त्र बंदीचा प्रस्ताव मांडण्याची हीच वेळ आहे.’ असे ते यावेळी म्हणाले. ‘आता वेळ आली आहे की या घटना थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवे.’

अधिक वाचा- Palghar: बॉयफ्रेंडला झाडाला बांधलं अन् गर्लफ्रेंडवर केला गँगरेप

कोण होती ऑड्रे हाले?

ऑड्रे हाले ही 28 वर्षीय ट्रान्सजेंडर नॅशव्हिलेमधील कॉनव्हेंट स्कूलची विद्यार्थिनी होती. शाळेनंतर, तिने नोसी स्कूल ऑफ आर्टमधून इलस्ट्रेशन आणि ग्राफिक डिझाइनमध्ये पदवी प्राप्त केली होती. ती कॉर्पोरेट्ससाठी लोगो डिझाइन करायची.

डेली बीस्टने आपल्या वृत्तात, ऑड्रेच्या जवळच्या लोकांचा हवाला देऊन म्हटले आहे की, ती एक ऑटिस्टिक विद्यार्थिनी होती, परंतु तरीही ती अभ्यास आणि इतर गोष्टींमध्ये खूपच सक्रिय होती.

अधिक वाचा- लॉरेन्स बिश्नोई गँगची दहशत पोहचली अंबरनाथपर्यंत, सराफा व्यापाऱ्याला भयंकर धमकी

ऑड्रेची आई ही बंदूक नियंत्रण कार्यकर्त्या (gun control activist) होती आणि ती अमेरिकेतील वाढत्या बंदूक संस्कृतीच्या विरोधात जोरदार आवाज उठवत होती. 2018 आणि 2019 मध्ये तिने यासंदर्भात एक छोटी मोहीमही सुरू केली होती. मात्र, दुर्दैवाने तिच्याच मुलीने एक असं कृत्य केलं की, ज्याने फक्त अमेरिकाच नाही तर अवघं जग हादरून गेलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT