Shraddha Walkar DNA: मेहरौलीच्या जंगलातील हाडांचे तुकडे श्रद्धाचेच!
दिल्ली : बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांड तपासात दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मेहरौलीच्या जंगलातून पोलिसांना मानवी हाडांच्या रुपात मृतदेहाचे काही तुकडे मिळाले होते, ते तुकडे श्रद्धाचे वडील विकास वालकर यांच्या डीएनएशी मॅच झाले आहेत. सीएफएसएलच्या अहवालातून याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक करून केलेल्या चौकशीदरम्यान त्याने श्रद्धांच्या मृतदेहाचे तुकडे मेहरौली आणि गुरुग्रामच्या […]
ADVERTISEMENT

दिल्ली : बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांड तपासात दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मेहरौलीच्या जंगलातून पोलिसांना मानवी हाडांच्या रुपात मृतदेहाचे काही तुकडे मिळाले होते, ते तुकडे श्रद्धाचे वडील विकास वालकर यांच्या डीएनएशी मॅच झाले आहेत. सीएफएसएलच्या अहवालातून याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.
दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक करून केलेल्या चौकशीदरम्यान त्याने श्रद्धांच्या मृतदेहाचे तुकडे मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलात फेकून दिल्याचं सांगितलं होतं. यानंतर पोलिसांनी मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलामध्ये अफताबने नमूद केलेल्या ठिकाणाहून हाडांच्या रूपात मृतदेहाचे अनेक तुकडे जप्त केले होते. यात पोलिसांना मानवी जबड्याचं हाडही सापडलं होतं.
याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी हे सर्व तुकडे सीएफएसएल लॅबला पाठवले होते. एवढचं नाही तर डीएनए चाचणीसाठी श्रद्धाच्या वडिलांचंही सॅम्पल घेण्यात आलं होतं. त्याच डीएनए चाचणीचा अहवाल आता प्राप्त झाला असून हे हाडांचे तुकडे श्रद्धा वालकरचे असल्याचं आता निष्पन्न झालं आहे.
चौकशी आणि पॉलीग्राफ चाचणीतही दिली हत्येची कबुली
यापूर्वी आफताबनं पोलीस चौकशीत आपणच श्रद्धाची हत्या केल्याचं मान्य केलं होतं. आफताबनं १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. जे ठेवण्यासाठी त्याने ३०० लिटरचा फ्रीज विकत घेतला होता. आफताब दररोज श्रद्धाच्या मृतदेहाचा एक तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे.