सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहात? मग ही नियमावली जरुर वाचा
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घटस्थापनेच्या मुहुर्तावर म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिर पुन्हा एकदा भाविकांसाठी खुली करायचं ठरवलं. कोविडचे सर्व नियम पाळून मंदिरं सुरु करण्यात येणार असल्यामुळे सर्व मंदिर समिती आणि प्रशासनाने जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान, पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर यांनी आपापल्या नियमावली जाहीर केल्या आहेत. यापाठोपाठ मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासनेही […]
ADVERTISEMENT
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घटस्थापनेच्या मुहुर्तावर म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिर पुन्हा एकदा भाविकांसाठी खुली करायचं ठरवलं. कोविडचे सर्व नियम पाळून मंदिरं सुरु करण्यात येणार असल्यामुळे सर्व मंदिर समिती आणि प्रशासनाने जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान, पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर यांनी आपापल्या नियमावली जाहीर केल्या आहेत.
ADVERTISEMENT
यापाठोपाठ मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासनेही भाविकांसाठी दर्शनासाठीचे नियम जाहीर केले आहेत.
दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी जाहीर करण्यात आलेले नियम –
हे वाचलं का?
घटस्थापनेच्या मुहुर्तावर विठूमाऊलीचं दार भक्तांसाठी खुलं, दररोज १० हजार भाविकांना मिळणार दर्शन
१) Siddhivinayak Temple App द्वारे नोंदणी केलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल.
ADVERTISEMENT
२) दर्शनासाठी येताना भाविकांनी कोरोना प्रतिबंधासाठी सरकारच्या सर्व नियम व सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT
३) १० वर्षांखालील मुलं, ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिलांनी शक्यतो दर्शनासाठी येणं टाळावं.
४) मंदिरात प्रवेश करताना मास्कचा वापर करणं बंधनकारक असेल.
५) भाविकांनी एकमेकांमध्ये ६ फुटांचं योग्य अंतर ठेवावं. मंदिर परिसरात यासाठी ६-६ फुटांवर स्टिकर्स बसवण्यात आले आहेत.
६) मंदिरात प्रवेश केल्यानंतर गर्दी करणं टाळावं.
७) भाविकांनी सामान, बॅग, लॅपटॉप सोबत आणू नये.
८) हार, फुले, नारळ, पुजेची सामुग्री, प्रसाद घेऊन येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
काही दिवसांपूर्वी राज्यात मंदिरं भाविकांसाठी खुली करावी यासाठी विरोधी पक्षाने सरकारविरुद्ध रस्त्यावर येत आंदोलन केलं होतं. परंतू कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला नव्हता. सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचं कळतंय. दुसरीकडे पंढरपुरात कोविडच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करुन प्रत्येत दिवशी फक्त १० हजार भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
याचसोबत शिर्डीतील साईबाबा मंदिरात दररोज १५ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून, १० वर्षाखालील मुलं, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व आजारी व्यक्ती तसेच मास्क न वापरणाऱ्या साईभक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
साईबाबा मंदिर होणार खुलं; कुणाला दिला जाणार प्रवेश?, दर्शनासाठीची नियमावली जाहीर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT