आईने डोळ्यासमोर घेतलं होतं पेटवून; सिद्धेश कांबळे सौरभ महाकाळ कसा बनला?
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचा तपास करणारी पंजाब, दिल्ली पोलीस महाराष्ट्रात पुण्यापर्यंत येऊन पोहोचलेत. सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्यांमध्ये पोलिसांना ८ जणांवर संशय आहे. या संशयित आरोपींमध्ये महाराष्ट्रातील दोन तरुण आहेत. एकाच नाव सौरभ महाकाळ आणि दुसरा संतोष जाधव. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ महाकाळचं खरं नाव आहे सिद्धेश कांबळे! सिद्धू मुसेवाला प्रकरणामुळे चर्चेत आलेला आणि संतोष जाधवला […]
ADVERTISEMENT
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचा तपास करणारी पंजाब, दिल्ली पोलीस महाराष्ट्रात पुण्यापर्यंत येऊन पोहोचलेत. सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्यांमध्ये पोलिसांना ८ जणांवर संशय आहे. या संशयित आरोपींमध्ये महाराष्ट्रातील दोन तरुण आहेत. एकाच नाव सौरभ महाकाळ आणि दुसरा संतोष जाधव. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ महाकाळचं खरं नाव आहे सिद्धेश कांबळे!
ADVERTISEMENT
सिद्धू मुसेवाला प्रकरणामुळे चर्चेत आलेला आणि संतोष जाधवला मदत करणारा पुणे जिल्ह्यातील मंचर भागात राहणारा सिद्धेश कांबळे नंतर सौरभ महाकाळ कसा बनला? याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती मती गुंग करणारी आहे…
सौरभ महाकाळच्या बालपणी काय घडलं?
हे वाचलं का?
संतोष जाधव मंचरचा, तर सौरभ महाकाळ म्हणजेच सिद्धेश कांबळे हा नारायणगावचा. सौरभ महाकाळ आयुष्यात बालपणीच मोठी घटना घडली. सौरभ महाकाळच्या आईवडिलांमध्ये सतत कुरबुरी आणि टोकाचे वाद व्हायचे. कधी-कधी आईवडिलांमधील वाद विकोपालाही जायचे.
सौरभ महाकाळ नऊ वर्षांचा त्याच्या कुटुंबात मोठी आघात करणारी घटना घडली. नवऱ्यासोबतच्या सततच्या भांडणांना कंटाळून सौरभ महाकाळच्या आईने पेटवून घेत आयुष्य संपवलं. ही घटना सौरभ महाकाळच्या नजरेसमोरचं घडली. सौरभ महाकाळच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं.
ADVERTISEMENT
Sidhu Moose Wala Case: वेश बदलून गुंगारा देणाऱ्या संतोष जाधवचा ठिकाणा पोलिसांनी कसा शोधला?
ADVERTISEMENT
दारूच्या आहारी गेलेल्या त्याच्या वडिलाचं मुलांवर लक्षही राहिलं नाही. दुसरं लग्न केल्यानंतर त्याचे वडील दुसऱ्या संसारात रमले. या घटनेनंतर सौरभ महाकाळवर कुणाचंही लक्ष राहिलं नाही आणि तो वाईट मुलांच्या संगतीत येत गेला.
वाईट मुलांची संगत लागल्यानंतर सौरभ महाकाळ संतोष जाधवच्या संपर्कात आला. पुढे सौरभ महाकाळ संतोष जाधवच्या सांगण्यावरून छोटे गुन्हे करू लागला आणि गुन्हेगारीच्या विश्वात आला. त्यानंतर तो गुन्हेगारी विश्चात फसतच गेला. धमकी देऊन पैसे उकळणे असे गुन्हे तो करत गेला.
Sidhu Moose Wala वर गोळ्या झाडणाऱ्या पुण्यातल्या संतोष जाधवची आई म्हणते……
एक ऑगस्ट २०२१ रोजी आंबेगावातील एकलहरे गावात सराईत गुन्हेगार संतोष जाधवने ओंकार बाणखेलेचा दगडाने डोकं ठेचून आणि नंतर गोळ्या झाडून क्रूरपणे खून केला होता. या प्रकरणात फरार असलेल्या संतोष जाधवला सौरभ महाकाळनेच आश्रय दिला होता.
२०२१ मध्येच त्याच्यावर मकोका प्रकरणातील आरोपीला आश्रय दिल्याचा गुन्हा दाखल झाला होता. मधल्या काळात दोघेही गायब झाले होते. त्यानंतर २०२२ मध्ये राजस्थानातील गंगानगरमधील जवाहर नगरमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सौरभ महाकाळवर दाखल झाला.
Sidhu Moose Wala Death: दिल्लीच्या तिहार तुरुंगातच रचण्यात आला सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट
याच काळात सौरभ महाकाळ राजस्थानातील लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात आला आणि आता त्याचं नाव सिद्धू मुसेवाला प्रकरणात संशयित आरोपी म्हणून आलंय.
सध्या पोलिसांनी त्याला संतोष जाधवला मदत केल्याच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीये. त्याला २० जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीये.
बंदूकांचा नाद आणि जय बालकरी
संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ ज्या लॉरेन्स गँगसाठी काम करतो. त्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करतात. तपासात समोर आलेल्या माहितीने पोलिसही चक्रावून गेले. सौरभ महाकाळ संतोष जाधव आणि गँगमधील इतरांनी बोलण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर करायचा.
संतोष जाधव, सौरभ महाकाळ आणि त्यांच्यासोबत काम करणारी मुलं यांच्या एकमेकांना परिचय करून देण्याचा खाणाखुणा आहेत. ते जय बालकरी असं म्हणून स्वतःची ओळख करून देतात.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँग,
का करण्यात आली हत्या?
त्याचबरोबर त्यांची काही इन्स्टाग्रामवर अकाऊंट्स असून, त्यातून त्यांनी लॉरेन्स बिष्णोईला अटक झाल्याच्या, त्यांच्या गँगने केलेल्या गुन्ह्यांबद्दलच्या वृत्तपत्रातील बातम्या कापून त्याची रिल्स बनवलीयेत. धक्कादायक बाब म्हणजे या रिल्ससाठी त्यांनी सिद्धू मुसेवालाची गाणी वापरली आहेत.
इन्स्टाग्रामला असलेल्या खात्यावर संतोष जाधवने एसजे असं बंदुकीनी तयार केलेली अक्षरांचा फोटो ठेवलेला आहे. त्यांना बंदूकाची आवड असल्याचंही त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून दिसतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT