स्मशानभूमीही गहिवरली: Corona मृत्यू झालेल्या 19 मृतदेहांवर उस्मानाबादमध्ये एकाचवेळी अंत्यसंस्कार
उस्मानाबाद येथील स्मशानभूमीही बुधवारी गहिवरली कारण कोरोनाने मृत्यू झालेल्या 19 रूग्णांच्या मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.उर्वरित आठ मृतदेह हे जागा नसल्याने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यावर आज (गुरूवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बुधवारचे स्मशानभूमीतील चित्र मन हेलावून टाकणारे होते. उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने कोरोनाचे सगळे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. Corona मृत्यूचं तांडव! अहमदनगरमध्ये […]
ADVERTISEMENT

उस्मानाबाद येथील स्मशानभूमीही बुधवारी गहिवरली कारण कोरोनाने मृत्यू झालेल्या 19 रूग्णांच्या मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.उर्वरित आठ मृतदेह हे जागा नसल्याने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यावर आज (गुरूवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बुधवारचे स्मशानभूमीतील चित्र मन हेलावून टाकणारे होते. उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने कोरोनाचे सगळे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले.
Corona मृत्यूचं तांडव! अहमदनगरमध्ये 29 मृतदेहांवर एकाचवेळी सरण रचून अंत्यसंस्कार
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला असून बेड , रेमडीसीवीर इंजेक्शन , ऑक्सिजन साठा संपत आला आहे, कोरोनाने आजवर 643 मृत्यू झाला आहे तर 4 हजार 940 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 307 रुग्ण सापडले तर तुळजापूर 40, उमरगा तालुक्यात 74 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतो आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 4 हजार 940 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत त्यामुळे रुग्णालयात रुग्णाची गर्दी झाली आहे. उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.