सिंधुदुर्ग: नितेश राणे 2 दिवसांनी फेसबुकवर अॅक्टिव्ह, शेअर केला फोटो; म्हणतात ‘गाडलाच..’
मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 19 पैकी तब्बल 11 जागांवर भाजपने विजय मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिलं आहे. पण ही निवडणूक खऱ्या अर्थाने रंगली ती राणे विरुद्ध शिवसेना अशीच. त्यातही ही निवडणूक आणखी एका वेगळ्या कारणामुळेच चर्चेत आली. ती म्हणजे कणकवलीतील संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे हे संशयित आरोपी आहेत. जे गेल्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 19 पैकी तब्बल 11 जागांवर भाजपने विजय मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिलं आहे. पण ही निवडणूक खऱ्या अर्थाने रंगली ती राणे विरुद्ध शिवसेना अशीच. त्यातही ही निवडणूक आणखी एका वेगळ्या कारणामुळेच चर्चेत आली. ती म्हणजे कणकवलीतील संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे हे संशयित आरोपी आहेत. जे गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. असं असताना आजच्या एकहाती विजयानंतर थेट फेसबुक पोस्टच नितेश राणेंनी शेअर केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या प्राणघात झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे हे संशयित आरोपी आहेत.
सतीश सावंतांचा ईश्वरचिठ्ठीने पराभव
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणे विरुद्ध सतीश सावंत अशी काँटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र या निवडणुकीत भाजपच्या विठ्ठल देसाई यांनी सतीश सावंत यांचा ईश्वर चिठ्ठीने पराभव केला. दोन्ही उमेदवारांना समसमान मतं पडल्याने अखेर ईश्वर चिठ्ठीने हा या निवडणुकीचा निकाल लागला. ज्यामध्ये सतीश सावंत यांना पराभव स्वीकारावा लागला.