KK : कधी सेल्समनची नोकरी, तर कधी रेडिओ जिंगल्स, रसिकांना वेड लावणाऱ्या केकेचा असा होता स्ट्रगल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आपल्या स्वरांनी रसिकांना वेड लावणारा केके गेला. केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ. कोलकातातील एका कार्यक्रमात रसिकांच्या मनाचा ठाव घेत असतानाच काळाने केकेला हिरावून घेतलं. केकेचं जाणं त्यांच्या चाहत्यांसाठी आणि संगीत क्षेत्राला चटका लावून गेलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कृष्णकुमार कुन्नथ नाव असलेला हा गायक जगभरात केके नावाने जगभरात पोहोचला. कृष्णकुमार कुन्नथचा जन्म नवी दिल्लीतील मल्याळी कुटुंबात झाला होता. केकेनं त्याचं शालेय शिक्षण पुर्ण केलं, ते माऊँट मेरी स्कूलमधून. त्यानंतर त्याने किरोडी मल महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पुर्ण केलं.

ADVERTISEMENT

केकेला लहानपणापासूनच गाण्याचं वेड होतं. त्याच्या या गाण्याविषयीच्या प्रेमाबद्दल केके एकदा सांगितलं होतं. “मी कधी गाणं शिकलो नाही. पण दुसऱ्या इयत्तेत असताना मी चांगलं गातो असं सगळे म्हणाले होते. त्यावेळी मी गाणं गायलं होतं. मला शाळेतच संगीताचे धडे मिळाले. मी चांगलं गातो हे कळल्यानंतर माझ्या शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिलं.”

ADVERTISEMENT

“शिकत गायला लागलो. त्यावेळी मला प्रत्येक ठिकाणी पहिलं बक्षीस मिळायचं. कॉलेजमध्ये असताना गाणं म्हणायचे पैसेही मिळायचे. पहिल्यांदा १५०० रुपये मिळाले होते. किरोडीमलमध्ये चांगलं वातावरण होतं. मी दूरदर्शनवर परफॉर्म केलेलं. मी किशोर कुमार यांची गाणी ऐकायचो. नंतर पाश्चिमात्य आणि रॉक गाणी ऐकायला लागलो. कॉलेजमध्ये असताना मी तीन रॉक बँड बनवले होते.”

केकेनं दिल्लीतूनच त्यांच्या संगीताच्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर केके आला तो मायानगरी मुंबईत. मुंबईत आल्यानंतर केकेने युटीव्ही साठी जवळपास ५ वर्ष वेगवेगळ्या भाषांमध्ये ३,५०० जिंगल्स गायिली. त्यानंतर केकेला भेटला ए.आर. रहमान. Kalluri Saaley और Strawberry Kannae ही गाणी रहमानने केकेकडून गाऊन घेतली.

आतापर्यंत केके झाकोळलेलाच होता. त्यानंतर आला ‘हम दिल दे चुके सनम’. याच सिनेमात केके ‘तडप तडप के इस दिल से’ हे गाणं गायलं आणि केकेचा आवाज घराघरात पोहोचला. त्यानंतर केकेनं मागे वळून बघितलं नाही. गुलजार यांच्या माचिसमध्ये केकेनं ‘छोड आए हम वो गलियाँ’ या गाण्यातील काही ओळी गायल्या आहेत. केकेला ओळख मिळवून दिली, ती ‘यारों दोस्ती’ आणि ‘प्यार के पल’ या गाण्यांनी ओळख मिळवून दिली.

कृष्णकुमार कुन्नथची केके असं नाव कसं पडलं? याबद्दल केकेनेचं एका कार्यक्रमात सांगितलं होतं. “मी जेव्हा दिल्लीत राहायचो, तेव्हाच लोक मला केके म्हणून हाक मारायचे. मुंबईत आल्यानंतर विचार केला की, कृष्ण कुमार इतकंच नाव ठेवू. मुंबईत आल्यानंतर लोक म्हणायला लागले कोण कृष्ण कुमार, दिल्लीतून आलेला केके का? त्यानंतर विचार केला की दोन नावाचा गोंधळ नको. लोक प्रेमाने ज्या नावाने हाक मारतात, तेच नाव ठेवायचं ठरवलं आणि मग मी केके झालो.”

शिक्षण पूर्ण केल्यानंतर केकेने सेल्समनची नोकरी केली होती. त्याने लहानपणीचं प्रेम असलेल्या मुलीसोबत लग्न केलं. ज्योती असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. केकेला दोन मुलं आहेत. मुलाचं नाव नकुल कृष्ण कुन्नथ, तर मुलीचं नाव तमारा कुन्नथ असं आहे. द कपिल शर्मा शो मध्ये केकेनं सांगितलं होतं की, “त्याची ज्योतीसोबत पहिली भेट सहाव्या वर्गात असताना झाली होती.”

मुलगा माझ्या करिअरसाठी लकी ठरला असं केके म्हणायचा. मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच केकेला बॉलिवूडमध्ये काम मिळालं होतं. त्याच्या पल अल्बमने त्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. दुसरा अल्बम हमसफर होता. केकेने बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी गायिली.

केकेच्या पल अल्बमची गाणी महबूबने लिहिली होती. १९९८ मध्ये गायक आणि संगीतकार लेझली लुईस यांनी केकेला संधी दिली होती. हा अल्बम सहा ते आठ महिन्यातच हिट ठरला. पल अल्बमच्या वेळीच केकेने ‘तडप तडप के’ गाण रेकॉर्ड केलं होतं. हे गाणं त्याच्या आवडत्या गाण्यांपैकी एक होतं.

गाण्यांची निवड करताना केके खूप विचार करायचा. याबद्दल त्याला एकदा विचारलही गेलं होतं. “मी असाच आहे. कदाचित हाच माझा मूळ स्वभाव आहे. मी खूप साऱ्या गोष्टी करायच्या टाळतो. जी काही थोडी गाणी मी गायिली आहेत, ती यशस्वी ठरली. पल या अल्बमनंतर दुसरा अल्बम काढायचा मी विचारही केला नव्हता. २००५-०६ मध्ये मी विचार करणं सुरू केलं आणि २००८ मध्ये हमसफर रिलीज झाला.”

केकेने चित्रपटांबरोबरच टिव्ही मालिकांचीही गाणी गायली. जस्ट मोहब्बत, शाका लाका बूम बूम, कुछ झुकी सी पलकें, हिप हिप हुर्रे, काव्यांजली आणि जस्ट डान्स या कार्यक्रमांचा समावेश आहे. गुरूकुल या रिआलिटी शोमध्ये केकेने जजच्या भूमिकेत होता.

साल २०२० मध्ये केकेने सिने इंडस्ट्रीमध्ये २५ वर्ष पूर्ण केली. त्याच्या २५ वर्षाच्या कारकीर्दीबद्दल केके म्हणाला होता, “माईलस्टोन वगैरे गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही. मला अजून खूप काम करायचं आहे. मी समाधानी आहे की, मनासारखं काम केलंय. माईलस्टोनबद्दल विचार करायला लागलो, तर मला वाटतं माझ्यातील कलाकार संपून जाईन. ते मला नकोय.”

केके त्याच्या आवाजासाठी ओळखला जायचा. केकेला प्रसिद्धीच्या झोतात राहणं आवडायचं नाही. त्यामुळेच माध्यमांमध्ये त्याचे फोटो कमी असायचे. अनेकदा तर लोक कॉन्सर्ट झाल्यावर तुम्ही केके आहात का, असं विचारतात, असंही तो एकदा म्हणाला होता.

केकेच्या अनेक गाण्यांनी लोकांच्या ह्रदयात स्थान मिळवलं. त्यामुळेच त्याच्या जाण्याने अनेकांना धक्का बसलाय. केकेचं निधन झाल्याच्या वृत्तावर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT