PUNE: चालू कारच्या बोनेटवर बसून घाटातून प्रवास, दोन तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी

मुंबई तक

पुरंदर: दिवे घाटात एक नवरी मुलगी चारचाकी वाहनांच्या बोनेटवर बसून भररस्त्यात फूट शूट करत असल्याचं समोर आलं होतं. त्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या गोष्टीला काही दिवस नाही उलटत तोच आता पुन्हा पुरंदर तालुक्यातील भिवरी गराडे रोडवर अतिउत्साही दोन युवक कारच्या बोनटवर बसून धोकादायक स्टंट करत असल्याचं दिसून आलं. पुरंदर तालुक्यातील भिवरी-गराडे रोडवरील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुरंदर: दिवे घाटात एक नवरी मुलगी चारचाकी वाहनांच्या बोनेटवर बसून भररस्त्यात फूट शूट करत असल्याचं समोर आलं होतं. त्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या गोष्टीला काही दिवस नाही उलटत तोच आता पुन्हा पुरंदर तालुक्यातील भिवरी गराडे रोडवर अतिउत्साही दोन युवक कारच्या बोनटवर बसून धोकादायक स्टंट करत असल्याचं दिसून आलं.

पुरंदर तालुक्यातील भिवरी-गराडे रोडवरील चतुर्मुख मंदिर परिसरात अनेक भाविक दर्शनासाठी त्याचबरोबर निसर्गरम्य परिसर असल्याने पर्यटनासाठी येत असतात. परंतु नुकतेच चतुर्मुख मंदिराच्या बाजूला असलेल्या धोकादायक घाटामधून आतिउत्साही दोन युवकांनी कारच्या बोनटवर बसून धोकादायकरित्या प्रवास केला.

गाडी चालकाला पुढील काहीच भाग दिसत नसल्याने बोनेटवरील एक युवक हातवारे करत चालकाला रस्ता सांगतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. अशा पद्धतीने धोकादायकरित्या कार चालवून जीवघेणा प्रवास करणं हे स्वत: सोबतच इतरांच्याही जीवावर बेतणारं ठरु शकलं असतं.

यावेळी कायद्याचा कोणताही धाक न बाळगता हे तरुण अत्यंत बेदरकारपणे गाडी चालविण्यास सांगत असल्याचं देखील व्हीडिओमध्ये पाहायला मिळतं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp