दुर्दैवी! डोंबिवलीत लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे डोंबिवली पूर्व भागातल्या सागर्ली गावात एका बेकायदा इमारतीला लिफ्टची सुविधा देण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने सागर्ली भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेदांत हनुमंत जाधव (वय-६) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो सांगर्लीमधील विघ्नहर्ता इमारतीत तळ मजल्याला आजी, आजोबा आणि वडिलांसोबत राहत […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे
ADVERTISEMENT
डोंबिवली पूर्व भागातल्या सागर्ली गावात एका बेकायदा इमारतीला लिफ्टची सुविधा देण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने सागर्ली भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेदांत हनुमंत जाधव (वय-६) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो सांगर्लीमधील विघ्नहर्ता इमारतीत तळ मजल्याला आजी, आजोबा आणि वडिलांसोबत राहत होता.
डोंबिवली: ‘तुमचे 50 हजार नको, मी देतो तुम्हाला 50 हजार’, मंत्री आठवलेंना चारचौघात सुनावलं!
हे वाचलं का?
वेदांत एक वर्षाचा असताना आईला तो पारखा झाला. त्याचा सांभाळ आजी, आजोबा करत होते. मंगळवारी सकाळी वेदांत नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी बाहेर गेला. तो दुपारी जेवण करण्यासाठी परत आला नाही. त्यानंतर त्याच्या आजी-आजोबांनी शोधाशोध केली. तो कुठेच आढळला नाही. त्याचे नेहमीचे मित्र घरी होते. त्यांनीही वेदांतला आम्ही पाहिले नाही असे सांगितले. त्यामुळे आजी आणि आजोबा घाबरले. परिसरातील रहिवाशांनी वेदांतचा शोध सुरू केला. या भागातील विहिरी, नाले तपासण्यात आले.
वेदांतचा शोध सुरू असताना रहिवाशांनी तो राहत असलेल्या इमारतीच्या शेजारी तपास केला. त्यावेळी वेदांत राहत असलेल्या इमारतीच्या शेजारी एका बेकायदा इमारतीला लिफ्ट सुविधा देण्यासाठी खोल खड्डा खणून ठेवला होता. त्या खड्ड्यातल्या पाण्यावर वेदांत तरंगताना आढळून आला. हे पाहून रहिवासी घाबरले. शिडी, दोर लावून त्याला बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वेदांतचे वडील खासगी सफाई कामगार आहेत.
ADVERTISEMENT
Dombivali : साक्षीदाराच्या टोपीमुळे १२ तासात हत्येचा आरोपी जेरबंद
ADVERTISEMENT
काही महिन्यांपूर्वी घडली होती अशीच घटना
काही महिन्यांपूर्वी सांगावमध्ये एका बेकायदा इमारतीला उद्वाहन सुविधा देण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू आहेत. यामधील बहुतांशी इमारतींना लिफ्टची सुविधा देण्यासाठी खड्डे खोदून ठेवले आहेत. अशा बेकायदा इमारतींवर कारवाई होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी सागाव परिसरात अनाधिकृत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती, सत्यम मौर्य अस या मुलांचं नाव असून तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कल्याण डोंबिवली शहरात बेकायदा बांधकामाबाबत लोकांची प्रचंड नाराजी असून पालिकेने बिल्डरला नोटीस पाठवली आहे, थातुरमातुर कारवाईही केली मात्र ही अनाधिकृत बांधकाम आजही सुरू आहे.
अनधिकृत बांधकामांच्या विरोधात अधिकारी फक्त दिखावा कारवाई करतात आणि त्याठिकाणी पुन्हाही बांधकाम केले जाते. काही महिन्यांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक विजय सूर्यवंशी यांनी शहरातील सर्व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र 8 वर्षांपासून अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीवर कारवाई का करण्यात आली नाही ? कारवाई केली असता तर आज एका सहा वर्षाच्या चिमुकल्याचा जीव वाचला असतं. मात्र आत्तापर्यंत जे दोन मृत्यू झाले त्याची जबाबदारी कोण घेणार? बिल्डर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ? की फक्त दिखावा कारवाई करून महापालिका प्रशासन स्वतःचे पाठ थोपटवून घेणार ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT