थरकाप उडवणारा अपघात! सोलापूरमध्ये भरधाव जीपचे टायर फुटले; पाच प्रवाशी जागीच ठार
प्रवासी घेऊन जाणाऱ्या प्रवाशी जीपचा टायर फुटून भीषण अपघात झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली. अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या जीपचा टायर फुटला. या अपघातात पाच प्रवाशी जागीच ठार झाले, तर 7 प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती आहे. अक्कलकोटहून एक प्रवासी जीप (क्रूझर जीप) सोलापूरच्या दिशेनं निघाली होती. भरधाव असलेल्या जीपचा अचानक पुढील टायर फुटला. त्यामुळे जीप […]
ADVERTISEMENT
प्रवासी घेऊन जाणाऱ्या प्रवाशी जीपचा टायर फुटून भीषण अपघात झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली. अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या जीपचा टायर फुटला. या अपघातात पाच प्रवाशी जागीच ठार झाले, तर 7 प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
अक्कलकोटहून एक प्रवासी जीप (क्रूझर जीप) सोलापूरच्या दिशेनं निघाली होती. भरधाव असलेल्या जीपचा अचानक पुढील टायर फुटला. त्यामुळे जीप उलटली. इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, जीपचा चेंदामेंदा झाला. तर पाच प्रवाशी जागीच ठार झाले. काही प्रवाशांचे मृतदेह रस्त्याच्या आजूबाजूला फेकले गेले.
हे वाचलं का?
तर जवळपास 7 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिकांनी दुर्घटनेतील जखमींना ग्रामस्थांना तातडीने बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने सोलापूर जिल्हा रुग्णालय, तसेच जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
ADVERTISEMENT
वळसंगजवळ असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर जीपचा टायर फुटला. त्यानंतर गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा यांचा समावेश आहे. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून, लक्ष्मण शिंदे असं त्यांचं नाव आहे. इतर मृतांची नावं अद्याप समजू शकली नाहीत, अशी माहिती वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली. मात्र या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचेही भोसले यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वळसंग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांकडून तपास केला जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने नागरिक खासगी प्रवासी वाहनांनी प्रवास करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहनात बसवले जात असल्याचाही प्रकारही सुरू आहे. मात्र, हा अपघात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवल्याने झाला की अन्य इतर कारणांनी हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT