खासदार राजीव सातव यांच्या मुलाने घेतली Rahul Gandhi यांची भेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या महामारीमुळे देशात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोनामुळे अनेक उमद्या राजकारण्यांनाही भारत गमावून बसला. महाराष्ट्र काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचंही काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं. राहुल गांधीच्या जवळचे मानले जाणाऱ्या राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला होता.

राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज आणि पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. प्रज्ञा सातव यांनी राहुल गांधींसोबतच्या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.

काही दिवसांपूर्वी ICSE बोर्डाचा दहावीचा निकाल लागला. राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज यावेळी दहावीच्या परीक्षेला बसला होता. या परीक्षेत चांगली कामगिरी करत पुष्कराजने ९८.३३ टक्के गूण मिळवले. हा निकाल लागल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी आपल्या मुलासह राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची एक जागा रिकामी झाली आहे. या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाहीत. परंतू राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या राजीव सातव यांच्या जागेवर भविष्यात त्यांच्या पत्नीचा विचार काँग्रेसकडून केला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT