इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या तात्या टोपेंची संघर्षगाथा
भारताला स्वातंत्र्य मिळालं १९४७ ला. मात्र या १९४७ च्या आधीही एक मोठा उठाव झाला होता. तो उठाव होता १८५७ चा उठाव. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ९० वर्षे आधीच हा उठाव झाला होता. या उठावात जर फंदफितुरी झाली नसती तर भारताला त्याच वर्षी स्वातंत्र्य मिळालं असतं. या उठावात आणि उठावानंतर सुमारे १० ते १२ महिने इंग्रजांना शेवटपर्यंत […]
ADVERTISEMENT

mumbaitak
भारताला स्वातंत्र्य मिळालं १९४७ ला. मात्र या १९४७ च्या आधीही एक मोठा उठाव झाला होता. तो उठाव होता १८५७ चा उठाव. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ९० वर्षे आधीच हा उठाव झाला होता. या उठावात जर फंदफितुरी झाली नसती तर भारताला त्याच वर्षी स्वातंत्र्य मिळालं असतं. या उठावात आणि उठावानंतर सुमारे १० ते १२ महिने इंग्रजांना शेवटपर्यंत नाकी नऊ आणणारे सेनानी होते तात्या टोपे. तात्या टोपे यांची आज १६३ वी पुण्यतिथी आहे तरीही अवघा देश त्यांचं ऋण विसरलेला नाही.
कोण होते तात्या टोपे?
तात्या टोपे यांचं मूळ नाव रामचंद्र पांडुरंग टोपे असं होतं. महाराष्ट्रातल्या येवला या ठिकाणी मराठी कुटुंबात तात्या टोपे यांचा जन्म झाला. त्यांना प्रेमाने तात्या म्हणत असत. त्यामुळे पुढे त्यांचं तेच नाव प्रचलित झालं, एवढंच नाही तर इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं.