अविनाश भोसलेंना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ८ जूनपर्यंत CBI कोठडी
अविनाश भोसलेंना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ८ जूनपर्यंत CBI कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना विशेष सीबीआय न्यायालयाने हा दणका दिला आहे. येस बँक आणि DHFL आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अविनाश भोसलेंना अटक करण्यात आली होती. पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसलेंना सत्र न्यायालयाने ८ जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. त्यांना २६ […]
ADVERTISEMENT
अविनाश भोसलेंना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ८ जूनपर्यंत CBI कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना विशेष सीबीआय न्यायालयाने हा दणका दिला आहे. येस बँक आणि DHFL आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अविनाश भोसलेंना अटक करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसलेंना सत्र न्यायालयाने ८ जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. त्यांना २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. सीबीआयने भोसले यांना न्यायालयासमोर हजर केलं त्यानंतर न्यायाधीश शिंगाडे यांनी दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि हा निर्णय दिला. भोसले यांना सीबीआयच्या गेस्ट हाऊसमध्ये तीन दिवस नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. न्यायालयाने दिलेला हा आदेश अविनाश भोसलेंसाठी मोठा धक्का मानला जातो आहे.
हे वाचलं का?
एप्रिल महिन्यात अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातल्या एकूण ८ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक Avinash Bhosle ना सीबीआयने केली अटक
ADVERTISEMENT
ईडीनं गेल्यावर्षी अविनाश भोसले यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली होती. अविनाश भोसले यांच्या व्यावसायिक भागीदारांवर देखील छापे टाकण्यात आले होते. डीएचएफल येस बँक लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयनं ही कारवाई केली आहे. सीबीआयनं अटकेची कारवाई करण्यापूर्वी ३० एप्रिल रोजी छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या वर्षी ते ईडीच्या रडारवर होते. त्यांचा मुलगाही या प्रकरणी ईडीच्या रडारवर होता. आता सीबीआयने त्यांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. पुण्यासह राज्यातल्या विविध भागांमध्ये त्यांची रिअल इस्टेटमधले यशस्वी व्यावसायिक अशी ओळख आहे. तसंच राजकीय नेत्यांसोबतही त्यांचे चांगले संबंध आहे. त्यामुळेही अविनाश भोसले चर्चेत असतात. काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. पुण्यातल्या बाणेर या भागात अविनाश भोसले यांचा व्हाईट हाऊस हा बंगला आहे. या हाऊसच्या टेरेसवर त्यांच्या मालकीचं हेलिकॉप्टरही आहे. रिक्षा व्यवसाय करण्यापासून रिअल इस्टेट किंग हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT