पाच लग्नं करून महिलांना फसवणारा बोगस डॉक्टर निघाला मसाला विक्रेता, वसई पोलिसानी केली अटक

मुंबई तक

वसईत सध्या बोगस डॉक्टरांच्या विरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. माजी वैद्यकीय अधिकारी सुनील वाडकर यांना पोलिसांनी अटक केल्याचं प्रकरण ताजं असतानाच स्वयंघोषित अस्थिरोग तज्ज्ञ हेमंत पाटील याला वसई पोलिसांनी अटक केली आहे. हेमंत पाटील हा बोगस डॉक्टर असून त्याने पाच लग्नं करून महिलांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत पाटीलने गुजरात आणि बडोदा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वसईत सध्या बोगस डॉक्टरांच्या विरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. माजी वैद्यकीय अधिकारी सुनील वाडकर यांना पोलिसांनी अटक केल्याचं प्रकरण ताजं असतानाच स्वयंघोषित अस्थिरोग तज्ज्ञ हेमंत पाटील याला वसई पोलिसांनी अटक केली आहे. हेमंत पाटील हा बोगस डॉक्टर असून त्याने पाच लग्नं करून महिलांची फसवणूक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत पाटीलने गुजरात आणि बडोदा येथील MBBS आणि MS Ortho अशा दोन बनावट पदव्याही तयार केल्या होत्या. एका डॉक्टरच्या नोंदणी क्रमांकावर त्याने वसईच्या उच्चभ्रू विभागात दवाखानाही थाटला होता. पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून याबाबत तक्रार दिल्यानंतर वसई पोलीस ठाण्यात त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील १३ दिवसांपासून हेमंत पाटील पोलिसांना गुंगारा देत होता अखेर सत्र न्यायालयात त्याचा जामीन नामंजूर झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ठाणे शहरातून अटक केली आहे…बुधवारी त्याला वसई सत्र न्यायालयात हजर केले असता १८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तीन वर्षे सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणं ही फसवणूक नाही- बॉम्बे हायकोर्ट

काय आहे प्रकरण?

हे वाचलं का?

    follow whatsapp