संप मिटेल, कर्जाचा डोंगर कमी होईल ! निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. विलीनकरणाची कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार नसल्याचं लक्षात येताच आणखी एका कर्मचाऱ्याने आपली जीवन संपवलं आहे. परभणीच्या जिंतूर येथील आगारात चालक म्हणून काम करणाऱ्या मुजफ्फर खान यांनी विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे.

ADVERTISEMENT

लागोपाठ सुरु असलेला संप, उत्पन्नाचा स्त्रोत कमी झाल्यामुळे कर्जबाजारीपणा आणि वरिष्ठांचा दबाव अशा बिकट परिस्थितीत अडकलेल्या मुजफ्फर यांनी अखेरीस आत्महत्येचा मार्ग स्विकारला आहे. एसटीचा संप सुरु असताना मुजफ्फर यांना कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल याची खात्री होती. परंतू कोर्टाकडून अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय न आल्यामुळे मुजफ्फर यांची निराशा वाढत गेल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं.

भोगाव येथील एका शिवारातील विहीरीत उडी मारुन मुजफ्फर यांनी आपलं आयुष्य आज संपवलं. या घटनेबद्दल कळताच आंदोलकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मुजफ्फर यांचा मृतदेह आंदोलनस्थळी आणण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलिसांत झटापटही झाली. यावेळी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT