ST कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, उस्मानाबाद जिल्ह्यात 36 कर्मचारी निलंबित
गणेश जाधव प्रतिनिधी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या 542 जणांचे निलंबन करण्यात आले त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील 6 आगारातील 36 कर्मचारी यांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात या आंदोलनात सहभागी कर्मचारी यांच्यावर प्रथमच निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या कर्मचारी यांचे […]
ADVERTISEMENT
गणेश जाधव प्रतिनिधी
ADVERTISEMENT
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या 542 जणांचे निलंबन करण्यात आले त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील 6 आगारातील 36 कर्मचारी यांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात या आंदोलनात सहभागी कर्मचारी यांच्यावर प्रथमच निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हे वाचलं का?
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या कर्मचारी यांचे निलंबन करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. मंगळवारी 376 कर्मचारी याचे तर बुधवारी 20 जिल्ह्यातील 542 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील 36, नागपूर 46,वर्धा 10,भंडारा 30,चंद्रपूर 15,अकोला 20, बुलढाणा 34, यवतमाळ 20,अमरावती 20,औरंगाबाद 10,बीड 22,परभणी 25,नाशिक 40,अहमदनगर 20,जळगाव 28, पुणे 26,सांगली 58,सातारा 2,सोलापूर 35 तर रायगड जिल्ह्यातील 19 कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले.
ADVERTISEMENT
उस्मानाबाद जिल्ह्यात एसटी कर्मचारी, वाहक व चालक यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. वेळेवर पगार मिळत नसल्याने व तुटपुंजी पगार असल्याने कर्मचारी आक्रमक झाले असुन राज्य सरकार आणखी किती कर्मचारी यांचा बळी घेणार असा सवाल केला आहे.कर्नाटक , गुजरात यासह अन्य राज्यात एसटी कर्मचारी यांना अधिक वेतन दिले जाते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात एसटी कर्मचारी यांना कमी वेतन दिले जात आहे त्यामुळे कर्मचारी यांच्यावर अन्याय होत आहे असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
ADVERTISEMENT
समस्या व भावना मांडताना कर्मचारी यांना अश्रू अनावर होत रडू कोसळत आहे मात्र सरकारला जाग येत नसुन निलंबन करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा व आंदोलन दडपून टाकण्यासाठी निलंबनाचे दबावतंत्र वापरल्याचा आरोप होत आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत एकही बस आगाराच्या बाहेर जाणार नाही असा इशारा देत मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पावित्रा आंदोलकानी घेतला आहे त्यामुळे आगामी काळात आंदोलन पेटणार असल्याचे दिसते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT