राज्याचा अर्थसंकल्प ‘या’ दिवशी मांडणार, अजित पवारांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून (3 मार्च) सुरुवात होणार आहे. या अधिवेशनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प. याचबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे 3 मार्च ते 25 मार्चपर्यंत मुंबईत होणार आहे. याच अधिवेशनात 2022-23 साठीचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. हा अर्थसंकल्प 11 मार्च (शुक्रवार) रोजी सभागृहात […]
ADVERTISEMENT
मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून (3 मार्च) सुरुवात होणार आहे. या अधिवेशनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प. याचबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे 3 मार्च ते 25 मार्चपर्यंत मुंबईत होणार आहे.
ADVERTISEMENT
याच अधिवेशनात 2022-23 साठीचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. हा अर्थसंकल्प 11 मार्च (शुक्रवार) रोजी सभागृहात सादर केला जाईल. अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
एकीकडे महागाईचा भडका उडत आहे. अशावेळी राज्य सरकार जनतेला कशाप्रकारे दिलासा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच या अधिवेशनाकडे राज्यातील अवघ्या जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.
हे वाचलं का?
पाहा अजित पवार नेमकं काय-काय म्हणाले:
11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प
ADVERTISEMENT
‘उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनात 11 मार्चला शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. 3 तारखेपासून साधारण 25 मार्चपर्यंत अधिवेशन चालवायचं ठरवलेलं आहे. शेवटी हा सगळा अधिकार हा कामकाज सल्लागार समितीचा आणि सभागृहाचा आहे. परंतु ठरवताना तरी कार्यक्रम संसदीय कामकाज मंत्र्यांनी जो दिलाय तो या तारखेपर्यंतचा दिला आहे. याशिवाय राज्यापालांचं देखील उद्या अभिभाषण होईल.’
ADVERTISEMENT
‘सर्व प्रश्नांची अतिशय व्यवस्थितपणे चर्चा करुन त्याला प्रत्येक प्रश्नाला आमच्याकडे उत्तर आहे आणि त्याला उत्तर देण्याचं काम आम्ही महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्र्यांच्यासहीत त्यांची जी टीम आहे ते सगळे जण मिळून त्या ठिकाणी करु.’ असं म्हणत अजित पवारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत माहिती दिली.
‘…म्हणून नागपूरऐवजी मुंबईत अधिवेशन’
‘आपल्याला माहिती आहे की, मागच्या वेळेस आम्ही जाहीर केलेलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला होईल. पण आता कोरोनाच्यामुळे हे अधिवेशन मुंबईत घेतोय. कोरोनाचा संसर्गाची तीव्रता कमी होत चालली आहे. ही वस्तूस्थिती खरी आहे.’
‘लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा प्रवास टाळावा आणि निवासादरम्यान काही संसर्ग होऊ नये अशा काही कारणांमुळे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय हा मागच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झाला होता. त्यावेळी काहींनी वेगवेगळी भूमिका मांडली परंतु नंतर सर्वांनी अधिवेशन मुंबईत घेण्याचं मान्य केलं.’ अशी माहिती अजित पवार म्हणाले.
‘विरोधी पक्ष नेते चहापानाला उपस्थित राहिले असते तर…’
‘आता उद्यापासून सुरु होत असलेल्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला आम्ही विरोधी पक्ष नेते सर्व विरोधी पक्षाचे प्रमुख यांना निमंत्रण दिलं होतं. परंतु त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं आणि त्यात उल्लेख केला की, आम्ही चहापानाला उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे ते चहापानाला उपस्थित नव्हते.’
‘आता विरोधी पक्ष नेते चहापानाला उपस्थित राहिले असते तर अधिवेशनाचं कामकाज अधिक प्रभावीपणे होण्याकरता किंवा तशी चर्चा झाली असती. परंतु तसं घडलं नाही. कधीपण चर्चेतून नेहमी काही ना काही चांगलं घडत असतं. आता मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल की, पाच दिवसाचं अधिवेशन होतं त्यावेळेस पाचही दिवस पूर्णपणे कामकाज म्हणजे जवळजवळ 24 बिलं आम्ही काढली.’
‘एखाद्या बिलाचा अपवाद वगळता बाकी सगळी बिलं ही चर्चेतून पूर्णत्वाला नेण्याचं काम आमच्या सरकारने केलं. त्याच बरोबर पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाची बैठक देखील झाली. मुख्यमंत्री हे व्हीसीद्वारे उपस्थित होते. त्यांनीही मार्गदर्शन केलं.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.
भाजपचे ‘हेच’ का ते साडेतीन नेते? जे आता आहेत महाविकास आघाडीच्या रडारवर
दरम्यान, आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाची नेमकी काय रणनिती असणार आणि त्याला सरकारी पक्ष कशाप्रकारे तोंड देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT