Vikram Gokhale: ‘तो’ विश्वासघातच होता, पण वेळ गेलेली नाही; Shiv Sena-BJP ने पुन्हा एकत्र यावं’

मुंबई तक

मुंबई: ‘भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. दोन्ही पक्षांची चूक आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावं. ही माझी प्रामाणिक इच्छा आहे.’ असं मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं आहे. ते शुक्रवारी (19 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्यात पत्रकारांशी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: ‘भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. दोन्ही पक्षांची चूक आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावं. ही माझी प्रामाणिक इच्छा आहे.’ असं मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं आहे. ते शुक्रवारी (19 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना भाजप-शिवसेना एकत्र यावं असं विक्रम गोखले म्हणाले होते. याचबाबत आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत पुन्हा एकदा व्यक्त केलं आहे.

आपला देश हा फार विचित्र अशा कड्यावर उभा आहे. त्यामुळे तिथून मागे यायचं असेल तर भाजप आणि शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे. असंही यावेळी विक्रम गोखले म्हणाले.

भाजप-शिवसेनेबाबत नेमकं काय म्हणाले विक्रम गोखले जाणून घ्या सविस्तरपणे.