लोकलवर टांगती तलवार, मुंबईत पुन्हा लॉकडाऊन?
मुंबईत 1 फेब्रुवारीपासून लोकल सर्वांसाठी सुरू झाली. सुरूवातीचे 7 – 8 दिवस कोरोना रुग्णसंख्याही कमीच होती. त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांसाठी पूर्णवेळ लोकल सुरू होणार अशी चिन्ह दिसू लागली होती. मुंबईकरही त्यामुळे काहीसे खुश होते, पण 9 – 10 तारखेपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आणि सुरू असलेली लोकलही आता बंद होते का? अशी स्थिती […]
ADVERTISEMENT

मुंबईत 1 फेब्रुवारीपासून लोकल सर्वांसाठी सुरू झाली. सुरूवातीचे 7 – 8 दिवस कोरोना रुग्णसंख्याही कमीच होती. त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांसाठी पूर्णवेळ लोकल सुरू होणार अशी चिन्ह दिसू लागली होती. मुंबईकरही त्यामुळे काहीसे खुश होते, पण 9 – 10 तारखेपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आणि सुरू असलेली लोकलही आता बंद होते का? अशी स्थिती निर्माण झाली.
याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. ते असं म्हणालेले की, ‘सध्या सुरू असलेली रुग्णवाढ ही रेल्वे प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे होत आहे, असे ठोस सांगता येणार नाही. आम्ही चाचण्यांची संख्या देखील वाढवली आहे. त्यामुळेही संख्या वाढू शकते’. शिवाय ते असंही म्हणालेले की, ‘सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलच्या वेळा वाढवण्यात आल्याने रूग्ण संख्येत वाढ होत आहे, का याचा आढावा प्रशासन घेत आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत हा आढावा सुरू राहणार असून तोपर्यंत लोकलच्या वेळा वाढवू नयेत, असे निर्देश रेल्वेला दिले आहेत’. पण मुंबईत 10 फेब्रुवारीला 558 रुग्ण आढळले आणि त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येत वाढच होत राहिली. अगदी गेल्या 24 तासांतही पुन्हा 736 रुग्ण आढळून आले.
त्यामुळे आता 22 फेब्रुवारीच्या बैठकीत मुंबई लोकल पूर्णवेळ सुरू होणार, असा निर्णय घेतला जाणं नाहीसं कठिण दिसत आहे. शिवाय सध्या सुरू असलेल्या मर्यादित कालावधीच्या लोकलवरही फेरविचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पूर्णवेळ धावणारी लोकल लवकर पाहता येणार नाही.











