जिल्हा बँकेत अपयश तरीही वैभव नाईकांचा राणेंना धक्का, समर्थक राजन तेलींचा केला पराभव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नारायण राणेंच्या पॅनलने बाजी मारत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. सलग तिसऱ्यांदा जिल्हा बँकेवर राणेंच्या गटाचं वर्चस्व असणार आहे, ज्यामुळे शिवसेनेला हा धक्का मानला जातोय. राणेंच्या गटाला आव्हान देण्यासाठी यंदा शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमाधून तगडं आव्हान निर्माण केलं होतं. परंतू मतदारांनी पुन्हा एकदा राणेंच्या समर्थकांच्या बाजूने आपला कौल दिला आहे.

ADVERTISEMENT

जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला अपयश आलं असलं तरीही शिवसेनेचे आमदार वैभव नाईक पुन्हा एकदा नारायण राणेंना धक्का देण्यात यशस्वी झाले आहेत.

राणे विरुद्ध शिवसेना वाद शिगेला : नितेश राणेंविरुद्ध मुंबईत पोस्टरबाजी, भाजपची कारवाई करण्याची मागणी

हे वाचलं का?

नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांनी राजन तेलींचा पराभव केला आहे. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून सुशांत नाईक विजयी झाले आहेत. भाजपच्या सिद्धीविनायक सहकार पॅनलने १९ पैकी ११ जागा जिंकत एकहाती वर्चस्व मिळवलं आहे. महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलला ८ जागा मिळाल्या आहेत.

सिंधुदुर्ग: जिल्हा बँकेवर राणेंचंच वर्चस्व, भाजप 11 जागांवर विजयी, महाविकास आघाडीला धोबीपछाड

ADVERTISEMENT

शिवसेना विरुद्ध नारायण राणे या संघर्षाप्रमाणेच सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध वैभव नाईक यांच्यातील वादाचा मोठी इतिहास आहे. वैभव नाईक यांनीच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव केला होता. राजन तेली हे नारायण राणेंच खंदे समर्थक मानले जातात, अशा उमेदवाराचा पराभव करत वैभव नाईकांनी पुन्हा एकदा राणेंना धक्का दिल्याचं बोललं जातंय. राजन तेलींचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतला हा तिसरा पराभव आहे. दरम्यान या निकालानंतर राजन तेली यांनी आपल्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीतल्या पराभवामुळे आपण राजीनामा दिला नसल्याचं तेलींनी सांगितलं असलं तरीही जिल्ह्यात या निमीत्ताने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत हे चिठ्ठीवर पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप दोघांमध्ये चुरस होती. कणकवली येथे सतिश सावंत यांचा पराभव नशिबाचा कौल ठरला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, राण तेली यांच्या पराभवामुळे त्यांना धक्का बसला आहे.

सिंधुदुर्ग: नितेश राणे 2 दिवसांनी फेसबुकवर अॅक्टिव्ह, शेअर केला फोटो; म्हणतात ‘गाडलाच..’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT