मृत व्यक्तीला जिवंत दाखवून शासनाची फसवणूक, अकोल्यातील वाईन शॉप चालकाला न्यायालयाचा दणका
– धनंजय साबळे, अकोला प्रतिनिधी अकोला शहरातील एका वाईन शॉप चालकाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. वाईन शॉपच्या परवान्याच्या नुतनीकरणासाठी बनावट दस्तावेज तयार करणं, २० वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी अकोल्यातील मद्यसम्राट म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. इतकच नव्हे तर ७ दिवसांत पोलिसांना […]
ADVERTISEMENT

– धनंजय साबळे, अकोला प्रतिनिधी
अकोला शहरातील एका वाईन शॉप चालकाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. वाईन शॉपच्या परवान्याच्या नुतनीकरणासाठी बनावट दस्तावेज तयार करणं, २० वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी अकोल्यातील मद्यसम्राट म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. इतकच नव्हे तर ७ दिवसांत पोलिसांना शरण जाण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जयस्वाल यांना दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयात जस्टीस इंदिरा बॅनर्जी आणि जस्टीस ए.के.महेश्वरी यांनी हा महत्वाचा आदेश दिला आहे.
काय आहे हे प्रकरण जाणून घ्या –
अकोल्याच्या गांधी चौकात विदर्भ वाईन शॉप नावाचं एक दुकान आहे. या दुकानाचे मुळ परवानाधारक पुरुषोत्तम गावंडे यांचा २० वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. परंतू त्यांच्या मृत्यूनंतरही जयस्वालने गावंडे जिवंत असल्याचं दाखवत दुकानाच्या परवान्याचं नुतनीकरण केलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर ही गोष्ट आल्यानंतर सखोल चौकशी केली असताना त्यांना हा प्रकार उघडकीस आला.










