गंगुबाई चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाने दिला हिरवा कंदील

मुंबई तक

अभिनेत्री आलिया भटची प्रमुख भूमिका असलेल्या गंगुबाई काठीयावाडी या सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शुक्रवारी ठरलेल्या वेळेप्रमाणे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात जस्टीस इंदिरा बॅनर्जी आणि जस्टीस जी.के.महेश्वरी यांच्या खंडपीठासमोर दोन दिवस झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाने निर्माते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेत्री आलिया भटची प्रमुख भूमिका असलेल्या गंगुबाई काठीयावाडी या सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शुक्रवारी ठरलेल्या वेळेप्रमाणे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात जस्टीस इंदिरा बॅनर्जी आणि जस्टीस जी.के.महेश्वरी यांच्या खंडपीठासमोर दोन दिवस झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाने निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना चित्रपटाचं नाव बदलणं शक्य आहे का असं विचारलं होतं. परंतू याला उत्तर देताना निर्मात्याच्या वकीलांनी ऐन वेळेला नावात बदल करणं शक्य नसल्याचं सांगितलं. खटला दाखल करणाऱ्या व्यक्तीकडे तो गंगुबाई यांनी दत्तक घेतलेला मुलगा असल्याचा फक्त दावा आहे, त्यासाठी कोणताही पुरावा नसल्याचं निर्मात्याच्या वकीलांनी सांगितलं.

२०११ साली छापण्यात आलेल्या या पुस्तकावर कोणीही आक्षेप घेतलेला नाही. या चित्रपटात गंगुबाई यांची कोणत्याही प्रकारे बदनामी झालेली नसल्याचं निर्मात्याचे वकील अर्यमा सुंदरम यांनी सांगितलं. याचिकाकर्त्यांनी फिल्म न पाहताच हे आरोप केल्याचं सुंदरम यांनी कोर्टासमोर सांगितलं. हा चित्रपट एका महिलेच्या संघर्षाची कहाणी असल्याचंही निर्मात्याचे वकील सुंदरम यांनी सांगितलं.

आलियाचा गुलाबो अवतार, फॅन्सच्या काळजावर थेट वार

हे वाचलं का?

    follow whatsapp