Supriya Sule :”मी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नाही, पण २०२४ ची निवडणूक…. ”
दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असा विश्वास व्यक्त केला. यानंतर सुप्रिया सुळे या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न त्यांना विचारला गेला. भाजपची सत्ता जेव्हा राज्यात आली तेव्हा पंकजा मुंडे यांचंही नाव मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आलं होतं. असं सगळं असलं तरीही राज्याचं राजकारण पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित […]
ADVERTISEMENT

दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असा विश्वास व्यक्त केला. यानंतर सुप्रिया सुळे या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न त्यांना विचारला गेला. भाजपची सत्ता जेव्हा राज्यात आली तेव्हा पंकजा मुंडे यांचंही नाव मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आलं होतं. असं सगळं असलं तरीही राज्याचं राजकारण पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्थान बळकट आहे. या सगळ्या प्रश्नी सुप्रिया सुळे यांनी मात्र महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न सुप्रिया सुळेंना चंद्रपुरात विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या की मी पदासाठी कोणतंही काम करत नाही. मात्र महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मी पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदार संघातून तिकिट द्यावं अशी मागणी करणार आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
भाऊबीजेला अजितदादांकडे ओवाळणी म्हणून सिलिंडर मागणार-सुप्रिया सुळे
२०२४ ची लोकसभा निवडणूक मी बारामती मतदारसंघातून लढवू इच्छिते. मी पदासाठी कुठलंही काम करत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी मी इच्छुक नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत. त्या खासदार म्हणून दिल्लीत जास्त काळ कार्यरत असतात. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून त्यांनी महाराष्ट्राकडेही थोडं जास्त लक्ष देण्यास सुरूवात केली आहे.










