Nashik मध्ये तांबेंचा गेम? BJPच्या पाठिंब्याबाबत दुसऱ्याच उमेदवाराचा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nashik MLC Election Update :

ADVERTISEMENT

नाशिक : विधान परिषद निवडणुकीची (MLC Election) घोषणा झाल्यापासून सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक (Nashik) पदवीधर आणि चर्चेतील उमेदवार म्हणजे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe). काँग्रेसमधून बंडखोरी करत अर्ज दाखल केल्यानंतर आपण भाजपसह इतर पक्षांचाही पाठिंबा घेणार असल्याचं तांबे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर भाजपही (BJP) तांबे यांनाच पाठिंबा देणार असल्याचा चर्चांना सुरुवात झाली होती. अशात भाजपच्या पाठिंब्याबाबत एका दुसऱ्याच उमेदवाराने दावा केला आहे. त्यामुळे आता तांबे यांचाच गेम होणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे. (Suresh Pawar, candidate of Swarajya Sangathan has claimed that only we will get the support of BJP and Shinde group)

भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच मिळेल, असा दावा स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी केला आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटासोबत बोलणी सुरु असून उद्यापर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघात तुम्हाला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतील, असं स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत आणखी ट्विस्ट येणं बाकी असल्याचं चित्र आहे.

हे वाचलं का?

Mood Of the Nation: लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये CM शिंदे कितव्या नंबरवर?

सत्यजीत तांबेंना भाजपचा पाठिंबा?

राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून भाजप अहमदनगरच्या एका बड्या राजकीय घराण्यातील युवा नेत्याला नाशिक पदवीधर विधानपरिषदेसाठी पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. अशात सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केल्याने हे युवा नेते म्हणजे सत्यजीत तांबेंच आहेत का? असा सवाल आता विचारला जाऊ लागला होता. त्यानंतर त्यांना भाजपचाही छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

ADVERTISEMENT

Mood of the Nation : महाराष्ट्र BJPची झोप उडवणारा कौल, MVA मारणार मुसंडी!

ADVERTISEMENT

मात्र विधान परिषदेच्या मतदानाला शेवटचे तीन दिवस बाकी असतानाही भाजपने कोणालाही अधिकृत पाठिंबा जाहीर केलेले नाही. अशातच सुरेश पवार यांच्या दाव्याने नाशिक पदवीधरमध्ये मोठा टिस्ट आला आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधून निलंबन आणि नंतर भाजपचाही पाठिंबा न मिळाल्यास तांबे यांनाही निवडणूक जड जाणार असल्याचं बोललं जाऊ लागलं. सत्यजीत तांबे यांच्या विरोधी उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT