सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या?, 2 वर्षानंतर सीबीआयचा तपास कुठंपर्यंत पोहोचलाय?
SSR death anniversary : १४ जून २०२०! साधारत: दुपारची वेळ होती. अचानक बातमी धडकली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह सापडला. त्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. हत्या की आत्महत्या, अशा शंका उपस्थित केल्या गेल्या अन् तपास सीबीआयकडे गेला. आज दोन वर्ष उलटूनही सुशांत सिंह राजपूतची हत्या केली गेली की आत्महत्या होती हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अभिनेता […]
ADVERTISEMENT

SSR death anniversary : १४ जून २०२०! साधारत: दुपारची वेळ होती. अचानक बातमी धडकली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह सापडला. त्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. हत्या की आत्महत्या, अशा शंका उपस्थित केल्या गेल्या अन् तपास सीबीआयकडे गेला. आज दोन वर्ष उलटूनही सुशांत सिंह राजपूतची हत्या केली गेली की आत्महत्या होती हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज (१४ जून) दुसरी पुण्यतिथी आहे. २०२० मध्ये आजच्याच दिवशी सुशांतचा मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळून आला होता. गळफास लागलेल्या अवस्थेत सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह सापडला होता.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून बरंच राजकारण झालं. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केली गेली. तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे गेला. पुढे या प्रकरणात एनसीबी (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग), ईडी आली. मात्र, अद्याप सुशांतच्या मृत्यूचं गुढ कायम आहे.
१४ जून २०२० पासून आतापर्यंत काय घडलं?