तुनिषाच्या आत्महत्येवर सुशांत सिंहच्या बहिणीचा मोठा दावा; म्हणाली, सुसाईड असूच शकत नाही
Tunisha Sharma Suicide Case: तरुण आणि प्रतिभावान अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने प्रत्येकजण हैराण आणि अस्वस्थ आहे. तुनिषा आत्महत्या करेन, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. तुनिषाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का पोहोचला आहे. सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्तीलाही तुनिषाच्या मृत्यूवर विश्वास बसत नाहीये. तिला खूप आश्चर्य वाटत आहे. सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्तीने तुनिषा […]
ADVERTISEMENT
Tunisha Sharma Suicide Case: तरुण आणि प्रतिभावान अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने प्रत्येकजण हैराण आणि अस्वस्थ आहे. तुनिषा आत्महत्या करेन, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. तुनिषाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का पोहोचला आहे. सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्तीलाही तुनिषाच्या मृत्यूवर विश्वास बसत नाहीये. तिला खूप आश्चर्य वाटत आहे.
ADVERTISEMENT
सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्तीने तुनिषा शर्माच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये तिने अभिनेत्रीच्या आत्महत्येवर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. श्वेता सिंह कीर्तीने तिच्या ट्विटमध्ये लिहिले, मला वाटत नाही की ही आत्महत्या आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये आत्महत्या कोण करतं? तिने पुढे प्रश्न विचारत लिहिले, दुसरा सुशांत सिंग राजपूत? काय होतंय कळत नाही. ती फक्त 20 वर्षांची होती. तुनिषाच्या आत्महत्येच्या बातमीने तिला धक्का बसल्याचे श्वेता सिंग कीर्तीच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे. तुनिषाने आत्महत्या केली यावर तिचा विश्वास बसत नाही. तसंच तिनं ही आत्महत्या नसल्याचा दावा देखील केला आहे.
हे वाचलं का?
शीजान खान पोलीस कोठडीत
त्याचवेळी तुनिशा आत्महत्या प्रकरणात एकापाठोपाठ एक नवीन खुलासे होत आहेत. तुनिषाच्या आत्महत्येचे कारण तिचा खास मित्र शीजान खान सांगितले जात आहे. अभिनेत्रीच्या आईनेही शीजनवर आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला आहे. तुनिषाच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शीजानवर कडक कारवाई केली आहे. शीजनला आता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शीजानची 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत चौकशी केली जाणार आहे.
तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणाची एफआयआर कॉपीही समोर आली आहे. एफआयआर कॉपीमध्ये अभिनेत्रीचा मृत्यूचा मोठा खुलासा समोर आला आहे. एफआयआर कॉपीमध्ये तुनिषा शर्मा तिचा को-अभिनेता शीजान खानसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र 15 दिवसांपूर्वी शीजानचे तुनिषासोबत ब्रेकअप झाले होते. शीजानसोबतचे नाते तुटल्यानंतर तुनिशा तणावात राहू लागली, ती खूप नाराज होती. शीजानसोबतचे नाते तुटल्याने नाराज होऊन तुनिषाने गळफास लावून घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तुनिषा शर्मा हिच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT