सुशील कुमारच्या अडचणी वाढल्या, किराणा दुकानदाराची पोलिसांत तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेल्या सुशील कुमारच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. सागर राणा हत्या प्रकरणात दिल्ली कोर्टाने सुशीलच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ केली आहे. यानंतर दिल्लीतील एका किराणा दुकानदाराने सुशील कुमारविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

Sagar Rana Murder : सुशील कुमारच्या पोलीस कोठडीत वाढ

सतीश गोयल असं या किराणा दुकानदाराचं नाव असून ४ लाखांची थकबाकी मागायला गेले असता सुशीलने आपल्याला धमकावून मारहाण केल्याची तक्रार गोयल यांनी केली आहे. सतीश गोयल हे गेली १८ वर्ष छत्रसाल स्टेडीयममध्ये किराणा माल पुरवण्याचं काम करतात. सुशीलचे सासरे सतपाल महाराज यांच्यापासून सतीश गोयल छत्रसाल स्टेडीयममध्ये मल्लांसाठी किराणा माल पुरवतात. बिरेंद्र नावाच्या एका प्रशिक्षकाने २०२० मध्ये लॉकडाऊनदरम्यान किराणा मालाची ऑर्डर आपल्याला दिली होती अशी माहिती सतीश गोयल यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिली.

हे वाचलं का?

या किराणा मालाचं ४ लाख बिल झालं. परंतू बिरेंद्र यांची ट्रान्स्फर झाल्यामुळे त्यांनी नवीन कोचकडून पैसे घ्यायला सांगितलं. काही दिवसांनी स्टेडीयममधून अशोक नावाच्या एका व्यक्तीचा गोयल यांना फोन आला आणि त्याने किराणा मालाची बिलं घेऊन स्टेडीयममध्ये येण्यास सांगितलं. सतीश गोयल यांनी सर्व किराणा मालाची बिलं दाखवल्यानंतर दुसऱ्या दिवशी छत्रसाल स्टेडीयममधून धर्मा नावाच्या एका व्यक्तीने गोयल यांना फोन करुन सुशील कुमारने भेटायला बोलावलं आहे असं सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

सुशील कुमारला भेटण्यासाठी सतीश गोयल गेले असताना त्यांनी सुशीलला आपली ४ लाखांची थकबाकी देण्याची विनंती केली. माझी थकबाकी तुम्ही दिली नाहीत तर माझ्यावर जीव जायची वेळ येईल. सतीश गोयल यांनी केलेल्या विनंतीनंतर सुशीलने त्यांना, अच्छा, मग जाऊन मरा असं म्हणत आपल्या माणसांना गोयल यांना धक्काबुक्की करत बाहेर काढलं. याविरोधात सतीश गोयल यांनी ८ सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली, परंतू पोलिसांनी यावर काही कारवाई केली नसल्याचं गोयल यांनी सांगितलं.

Sushil Kumar Arrested : ऑलिम्पिक पदक विजेता ते हत्येचा आरोपी, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं?

सुशीलला अटक झाल्यानंतर आता दिल्ली पोलीस माझ्या तक्रारीवर कारवाई करतील असं सांगत आहे. सुशीलचा साथीदार अजयनेही माझ्याकडून २५ हजाराचा किराणा माल घेतल्याचं गोयल यांनी सांगितलं. परंतू अजयनेही आपले पैसे दिले नसल्याचं गोयल यांनी सांगितलं. छत्रसाल स्टेडीयममध्ये सराव करणाऱ्या मल्लांनी किराणा मालाचे पैसे देण्यासाठी प्रशिक्षकांनी सर्वांकडून पैसे घेतल्याचं सांगितलं. परंतू हे पैसे आपल्याला कधीच मिळाले नाहीत असं गोयल म्हणाले. स्टेडीयममध्ये हे सर्व मल्ल मोठमोठ्या गाड्यांमधून ये-जा करतात. सुरुवातीला आपल्या कष्टाच्या कमाईतून त्यांनी या गाड्या घेतल्या असतील असं मला वाटायचं. पण या सगळ्याचा संबंध गुन्हेगारीशी असेल असं मला वाटलं नव्हतं, असं गोयल म्हणाले.

Sagar Rana Murder : सुशीलच्या सांगण्यावरुन सागरला मारहाण केली, अटकेतील आरोपीची पोलिसांकडे कबुली

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT