Talathi Suicide: तलाठ्याने तहसील कार्यालयातच गळफास घेऊन केली आत्महत्या
बुलडाणा: बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील नांदूरा येथील तहसील कार्यालयातील (Tehsil Office) तलाठ्याने (Talathi) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. अनिल अंभोरे असे या आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचं नाव असून आज (15 एप्रिल) सकाळी तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहात दोरीच्या सहाय्याने या तलाठ्याने आत्महत्या केल्याचं आढळून आलं आहे. नांदूरा […]
ADVERTISEMENT

बुलडाणा: बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील नांदूरा येथील तहसील कार्यालयातील (Tehsil Office) तलाठ्याने (Talathi) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. अनिल अंभोरे असे या आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचं नाव असून आज (15 एप्रिल) सकाळी तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहात दोरीच्या सहाय्याने या तलाठ्याने आत्महत्या केल्याचं आढळून आलं आहे.
नांदूरा तहसील कार्यालयात आज गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास 45 वर्षीय तलाठी अंभोरे यांनी गळफास घेतल्याचं उघडकीस झाल्यानंतर येथील इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पुण्यात इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
याबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र, नांदूरा तहसील अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत असलेले अनिल अंभोरे यांनी सकाळी तहसील कार्यालयातील येऊन आपल्या केबिनमधील स्वछतागृहात गळफास घेतला. सदर प्रकार उघडीस येताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तात्काळ पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.