Tata Airbus : ‘मुख्यमंत्र्यांनी जनतेला सत्य सांगावं’; सुप्रिया सुळेंचं ट्विट, शिंदेंना आवाहन
टाटा एअरबस प्रोजेक्टबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडलेल्या वेगवेगळ्या भूमिकांवर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदेंनी सत्य सांगून गोंधळ दूर करावा, अशी मागणी केलीये. टाटा एअरबस प्रोजेक्टबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलंय. यात सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेले आहेत. […]
ADVERTISEMENT

टाटा एअरबस प्रोजेक्टबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडलेल्या वेगवेगळ्या भूमिकांवर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदेंनी सत्य सांगून गोंधळ दूर करावा, अशी मागणी केलीये.
टाटा एअरबस प्रोजेक्टबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलंय. यात सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेले आहेत. नागपूरला होऊ घातलेला टाटा एअर बसचा सुमारे २१ हजार ९३५ कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा प्रकल्प वडोदरा येथे गेला.”
टाटा एअरबस प्रोजेक्टबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“या प्रकल्पाच्या माध्यमातून ६ हजार जणांना रोजगार मिळणार होते. काही दिवसांपुर्वीच वेदांत फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प देखील गुजरातला गेला. हा अगोदर पुणे जिल्ह्यातील चाकण येथे होणार होता. सुमारे १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात होती”, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
“राज्यातील सुमारे दीड लाख लोकांना यामुळे रोजगार उपलब्ध होणार होता. याखेरीज रायगड जिल्ह्यात होऊ घातलेला बल्क ड्रग पार्क हा सुमारे पावणेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा प्रकल्प देखील गुजरातला गेला. या प्रकल्पातून राज्यातील ८० हजार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या”, असा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी मांडला आहे.