एअर इंडियाचा सरकारला ‘टाटा’; साडेसहा दशकानंतर ‘महाराजा’ची मालकी पुन्हा टाटा समूहाकडे

मुंबई तक

एअर इंडियाचा ताबा आता पुन्हा एकदा म्हणजे साठ वर्षांहून अधिक काळांनी टाटांकडे आला आहे. आज लिलावात टाटा ग्रुपने एअर इंडिया खरेदी करून पुन्हा एकदा त्याचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. Welcome Back Air india असं म्हणत रतन टाटांनी यासंदर्भात ट्विटही केलं आहे. काय म्हणाले आहेत रतन टाटा? टाटा ग्रुपने एअर इंडिया लिलावात जिंकलं आहे. ही आपल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एअर इंडियाचा ताबा आता पुन्हा एकदा म्हणजे साठ वर्षांहून अधिक काळांनी टाटांकडे आला आहे. आज लिलावात टाटा ग्रुपने एअर इंडिया खरेदी करून पुन्हा एकदा त्याचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. Welcome Back Air india असं म्हणत रतन टाटांनी यासंदर्भात ट्विटही केलं आहे.

काय म्हणाले आहेत रतन टाटा?

टाटा ग्रुपने एअर इंडिया लिलावात जिंकलं आहे. ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी आहे. आता एअर इंडियाला पुन्हा तोच लौकिक मिळवून देण्यासाठी आपण सगळे नेटाने प्रयत्न करू. आपण असं केल्याने आपल्याला व्यवसायाची नवी कवाडं खुली होणार आहेत.

आज मी थोडासा भावनिक झालो आहे कारण, एअर इंडियाचा प्रवास हा MR J. R.D टाटांनी सुरू केला होता. जगातल्या सर्वात सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या एअरलाईन्सपैकी एअर इंडिया ही एक कंपनी त्यावेळी होती. आता टाटा ग्रुपला ही संधी आहे की ते गतवैभव एअर इंडियाला परत मिळवून द्यावं. त्यामुळे जे आर. डी टाटांनी काय कार्य केलं होतं हेदेखील पुन्हा एकदा जगाला कळेल.

आम्ही सरकारचे आभार मानतो, आम्हाला ही संधी दिल्याबद्दल.

-रतन टाटा

एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. टाटा सन्ससोबत स्पाइसजेटही स्पर्धेत होते. मात्र या लिलावात टाटांनी बाजी मारली आहे. टाटा समूहाने एअर इंडियासाठी 18 हजार कोटींची बोली लावली. डिसेंबरच्या अखेरपर्यंत एअर इंडियाच्या हस्तांतराचा व्यवहार पूर्ण होईल अशी माहिती डीयापीएएमचे सचिव तुहिन कांत पांडे आणि नागरि उड्डयन मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांनी दिली आहे.

जेआरडी टाटांनी सुरू केली होती एअर इंडिया

एअर इंडिया कंपनीची स्थापना टाटा उद्योग समूहाचे प्रमुख जेआरडी टाटा यांनी केली होती. जेआरडी टाटा स्वतः वैमानिक होते. त्यामुळे या कंपनीचं नाव टाटा एअर सर्विस असं ठेवण्यात आलं होतं. १९३८ मध्ये कंपनीने देशातंर्गत विमानसेवा सुरू केली होती. दरम्यान, दुसऱ्या महायुद्धानंतर कंपनीचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp