चक्रीवादळ: महाराष्ट्राच्या दिशेने सरकतंय ‘टाँकटाई’ वादळ, किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा
मुंबई: महाराष्ट्राच्या (Maharashta) पश्चिम किनारपट्टीवर गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळ धडकलं होतं. या चक्रीवादळामुळे कोकण (Konkan) किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. आजवरचं ते सर्वात मोठं भीषण असं चक्रीवादळ होतं. या चक्रीवादळाला (Cyclone) वर्षही पूर्ण झालेलं नसताना आता यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ हे 16 मे रोजी महाराष्ट्रात धडकण्याची दाट शक्यता आहे. टाँकटाई […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्राच्या (Maharashta) पश्चिम किनारपट्टीवर गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळ धडकलं होतं. या चक्रीवादळामुळे कोकण (Konkan) किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. आजवरचं ते सर्वात मोठं भीषण असं चक्रीवादळ होतं. या चक्रीवादळाला (Cyclone) वर्षही पूर्ण झालेलं नसताना आता यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ हे 16 मे रोजी महाराष्ट्रात धडकण्याची दाट शक्यता आहे. टाँकटाई असं या चक्रीवादळाला (Tauktae Cyclone) नाव देण्यात आलं असून ते महाराष्ट्र आणि गोव्याच्या दिशेने सरकत असल्याचं सध्या समजतं आहे.
ADVERTISEMENT
या चक्रीवादळाचा फटका हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्हांना फटका बसू शकतो. या चक्रीवादळामुळे मुंबईसह पालघर आणि ठाण्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर रायगड जिल्हात मात्र वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारपासून मुंबई आणि शहर भागात ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 14 मे सकाळी अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून 15 मे रोजी हा कमी दाबाचा पट्टा लक्षव्दीप बेटांजवळ सरकणार असल्याचं सध्या तरी दर्शवत आहे.
हे वाचलं का?
महाबळेश्वरमध्ये तुफान गारपीट, स्थानिकांसह नागरिकांचं रस्त्यावर स्केटिंग
इथून हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत जाणार आहे आणि 16 मे रोजी मध्य पूर्व अरबी समुद्रात या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर होईल अशी माहिती IMD ने दिली आहे.
ADVERTISEMENT
16 मे महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात वादळी वारे वाहतील आणि या भागातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जे मच्छीमार खोल समुद्रात आहेत त्यांनी लवकरात लवकर जवळच्या किनाऱ्यावर परण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर असा या चक्रीवादळाचा प्रवास असणार आहे. नंतर हे वादळ गुजरातकडे सरकू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गुजरात सरकारने देखील चक्रीवादळासंबंधी सर्तकतेचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे केरळ सरकारने देखील 6 जिल्हांमध्ये ऑरेंज कोड इशारा दिला आहे. तसंच कोस्ट गार्ड, एनडीआरएफ आणि नौदलाला देखील या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे.
उत्तराखंड दुर्घटना : मृतांचा आकडा ३२ वर, १९७ जण अजुनही बेपत्ता
टाँकटाई या चक्रीवादळाची सुरुवात ही म्यानमारच्या समुद्रातून झाली असल्याचं समजतं आहे. आता या वादळानी आगेकूच सुरु झाली असून ते हळूहळू भारताच्याच दिशेने सरकत आहे. महाराष्ट्रात जेव्हा हे चक्रीवादळ धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग हा साधारण 40 ते 50 ताशी किमी असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण या चक्रीवादळाने प्राप्त केलेली शक्ती जर अधिक असेल तर वाऱ्याचा वेग हा जास्त असू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT