उद्धव ठाकरेंची टीम तयार? शिंदेंना घेरण्याचं नियोजन ठरलं…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आता जवळपास २ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र याकाळात उद्धव ठाकरे यांची नवीन टीम तयार होताना दिसतं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले, ते बंड यशस्वी झाले. त्यांनी जाताना आमदार नेले, खासदार नेले, पक्षावरही ताबा मिळवण्यासाठी नियोजन केले जात आहे. आम्हीच खरी शिवसेना म्हणून शिंदेंनी […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आता जवळपास २ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र याकाळात उद्धव ठाकरे यांची नवीन टीम तयार होताना दिसतं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले, ते बंड यशस्वी झाले. त्यांनी जाताना आमदार नेले, खासदार नेले, पक्षावरही ताबा मिळवण्यासाठी नियोजन केले जात आहे. आम्हीच खरी शिवसेना म्हणून शिंदेंनी घोषितही करुन टाकले आहे. या सगळ्यात त्यांनी थेट आव्हान दिले ते उद्धव ठाकरे यांना. पण हे सगळे असताना उद्धव ठाकरे यांनी उरलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन नवीन टीम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी सोडून गेलेल्या आमदार आणि खासदारांच्या मागे लागण्यापेक्षा सोबत असलेले तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, माजी नगरसेवक, इतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. अशात जे दुसऱ्या पक्षातील आपल्याकडे येतील अशांचाही मोगावा घेऊन त्यांना शिवसेनेत घेतले आहे. जेव्हापासून शिंदेंनी बंड केले, तेव्हापासून अनेकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे, तर कोणी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे, तर कोणी पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे.
शिंदे गटातील १५ आमदार फोन करुन म्हणतात, “साहेब आमचं चुकलं… आम्हाला माफ करा”
शिवसेनेचे बंडखोर खासदार हेमंत पाटील यांना आस्मान दाखविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पक्षात घेतले. आधी शिवसेना नंतर भाजप, काँग्रेस आणि आता परत शिवसेना असा वानखेडेंचा प्रवास आहे. त्यानंतरच महत्त्वाचं नाव म्हणजे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर, याचे. ठाकरे यांनी संतोष टारफे आणि अजित मगर या बांगरांच्या दोन प्रतिस्पर्ध्यांना शिवसेनेत घेतले आहे. दोघांनीही ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले. संतोष टारफे हे काँग्रेसचे माजी आमदार तर वंचित आघाडीचे अजित मगरांची हिंगोलीत मोठी ताकद आहे.