Terror Plot: महाराष्ट्र ATS कडून संशयित दहशतवाद्याला अटक, रचलेला मोठ्या घातपाताचा कट

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS)मुंबईतील वांद्रे परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद इरफान रहमत अली शेख असे या दहशतवाद्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी अटक केलेले दोन संशयित दहशतवादी यांच्याशी इरफान संबंधित होता असे सांगितले जात आहे. हे सर्व जण देशात मोठे घातपाती हल्ल्याचे कारस्थान रचत होते. एएनआय वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (30 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS)मुंबईतील वांद्रे परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद इरफान रहमत अली शेख असे या दहशतवाद्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी अटक केलेले दोन संशयित दहशतवादी यांच्याशी इरफान संबंधित होता असे सांगितले जात आहे. हे सर्व जण देशात मोठे घातपाती हल्ल्याचे कारस्थान रचत होते.

एएनआय वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (30 सप्टेंबर) मुंबई एटीएसने गुप्त माहितीच्या आधारे एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. अटक करण्यात आलेला दहशतवादी इरफानला मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला 4 ऑक्टोबरपर्यंत एटीएस रिमांड मिळाला आहे.

एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हे सर्व दहशतवादी देशात बॉम्बस्फोटाची योजना आखत होते. यावेळी अटक करण्यात आलेल्या इरफानकडून मोबाईल फोन आणि काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तान समर्थित दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित इरफानला अटक करण्यात आली आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफानकडून अनेक महत्त्वाची माहिती मिळू शकते.

अटक केलेल्या संशयिताचे नाव इरफान रहमत अली शेख असे आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. तो मुंबईच्या वांद्रे परिसरात असलेल्या खेरवाडीचा रहिवासी आहे आणि व्यवसायाने तो टेलर आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp